औरंगाबाद शहरात आणखी 32 रुग्ण आढळले, बाधितांचा आकडा 200 पार
औरंगाबाद । वार्ताहर
शहरात शुक्रवारी सायंकाळी आणखी 32 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे उघडकीस आले. घाटी रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. काननबाला येळीकर यांनी याबाबत माहिती दिली.
शुक्रवारी दुपारी चार वाजेपर्यंत जवळपास 292 लाळेचे नमुने तपासण्यात आले. मात्र त्यात एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला नाही. मात्र सायंकाळी सात वाजता तब्बल 32 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे आढळून आले. त्यामुळे शहरातील कोरोना व्हायरस बाधितांची संख्या आता 209 वर पोहोचल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. येळीकर यांनी दिली.
आज सकाळपासून शांत बसलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येने सायंकाळी उसळी घेतली आणि आकडा 200 पार गेला. त्यामुळे संभाजीनगरची चिंता वाढली आहे. या 32 जणांमध्ये संजयनगर मुकुंदवाडी येथील 18, नूर कॉलनी येथील 3, वडगाव कोल्हाटी येथील 1, असेफिया कॉलनी येथील 3, भडकल गेट येथील 1, गुलाबवाडी पदमपुरा येथील 2, सिटी चौक येथील 1, महमूदपुरा येथील 1 आणि भीमनगर येथील 2 जणांचा समावेश आहे.
आताची ताजी कोरोना स्थिती
उपचार घेत असलेले रुग्ण - 177
कोरोनामुक्त झालेले रुग्ण - 24
मृत्यू पावलेले रुग्ण - 8
एकूण - 209
Leave a comment