दिल्ली --
वेगवेगळ्या राज्यांमध्ये अडकून पडलेले विद्यार्थी, स्थलांतरित मजूर,
यात्रेकरू यांना परत आणण्यासाठी ट्रेन ची व्यवस्था करण्याला केंद्रीय
गृहमंत्रालयानं हिरवा कंदील दाखवला आहे.
राज्यांनी रेल्वे बोर्डाशी चर्चा करुन त्यासंबंधीचा निर्णय घ्यावा, असे
गृहगमंत्रालयाच्या संयुक्त सचिव पुण्य सलिला श्रीवास्तव यांनी म्हटले आहे.
वेगवेगवेगळ्या
राज्यात अडकलेल्या मजुरांना परत आणण्यारठी स्पेशल
ट्रेन्सची व्यावस्था केली होती अशी मागणी महाराष्ट्रासह अन्य राज्यांनी
केली होती.त्यानुसार आता या 'श्रमिक स्पेशल' गाड्या राज्या-राज्यादरम्यान
धावतील. नाशिक ते लखनौ, नाशिक ते भोपाळ, जयपूर ते पटना आणि
कोटा ते हटिया दरम्यान विशेष गाड्या सुरू करण्यात येतील.दरम्यान शुक्रवारी (1 मे) पहाटे तेलंगणाच्या लिंगमपल्ली इथून
झारखंडच्या हटियासाठी एक स्पेशल ट्रेन सोडण्यात आली. शुक्रवारी
पहाटे 4 वाजून 50 मिनिटांनी निघालेल्या या ट्रेनला 24 कोचेस होते. या
गाडीमधून 1200 प्रवासी लिंगमपल्ली ते हटिया प्रवास करत होते.
रेल्वे प्रोटेक्शन फोर्सचे डीजी अरुण कुमार यांनी हिंदुस्तान टाइम्सशी
बोलताना म्हटलं, " 24 कोचेस असलेली ट्रेन 1200 प्रवाशांना घेऊन
झारखंडवरुन हटियासाठी निघाली आहे. ट्रेन सुरू करण्याचा निर्णय आज
घेण्यात आलाय."ट्रेनबद्दल रेल्वेकडून सांगण्यात आलं, "तेलंगणा सरकारनं केलेली विनंती
आणि रेल्वे मंत्रालयाच्या सूचनांनुसार लिंगमपल्लीहून रांचीतील
हटियापर्यंत एक स्पेशल ट्रेन सोडण्यात आली. ही ट्रेन सोडताना सर्व
प्रकारचे खबरदारीचे उपाय घेण्यात आले आहेत. प्रवाशांचं स्क्रीनिंग
करण्यात आलं, स्टेशन आणि ट्रेनमध्येही सोशल डिस्टन्सिंगची
खबरदारी घेतली गेली. अशा प्रकारची ही पहिली ट्रेन आहे आणि रेल्वे
मंत्रालयाच्या सूचनांनुसार अशा विशेष ट्रेन्स चालवल्या जातील. ज्या
राज्यातून ट्रेन सुटणार आहे आणि ज्या राज्यात पोहोचणार आहेत त्यांच्या
विनंतीवरही हे अवलंबून असेल.
केरळमधील अलुवा ते भुवनेश्वरदरम्यानही स्थलांतरितांना आणण्यासाठी
स्पेशल ट्रेन धावणार आहे. 1140 प्रवासी या ट्रेनमधून प्रवास करतील,
अशी माहिती दक्षिण रेल्वेचे वरिष्ठ डिव्हिजनल कमर्शियल मॅनेजर डॉ.
राजेश चंद्रन यांनी दिली.
Leave a comment