नेकनुर/ वार्ताहर
येथील दैनिक पुण्यनगरी चे प्रतिनिधी सय्यद जमील सय्यद मोहम्मद यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने शुक्रवार ता. 1रोजी निधन झाले मृत्युसमयी ते 56 वर्षांचे होते.
मागील 20 वर्षांपासून पत्रकारितेत असणारे सय्यद जमील यांनी लोकांचे प्रश्न सोडवत दैनिक पुण्यनगरी मध्ये पत्रकारिता करत होते. शुक्रवारी सकाळी छातीत दुखण्याचा त्रास होऊ लागल्याने बीड येथील खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते उपचारादरम्यान हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचे निधन झाले .त्यांच्या अकाली निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. सदैव हसमुख मित्रांच्या सहवासात वावरणाऱ्या सय्यद जमील यांच्या अकाली निधनाने हळहळ व्यक्त होत आहे .त्यांच्या पश्चात आई-वडील,भाऊ, पत्नी , दोन मुले, सुन ,नातू असा मोठा परिवार आहे.
Leave a comment