धोंडराई । वार्ताहर
पाण्याच्या व खाण्याच्या शोधात भटकंती करत असलेल्या हरणाच्या कळपापैकी एका हरणाला अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत हे हरीण गंभीर जखमी झाले होते.रस्त्याच्या कडेला पडलेले जखमी हरीण दिसताच धोंडराईतील तरुणांनी त्या हरणाला आपल्या मोटारसायकल वर टाकुन धोंडराई येथील पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये त्यावर उपचार करुन त्या हरणास गावातील शाळेत ठेवून त्या जखमी हरणाचे प्राण वाचवले .मानवतेचे दर्शन घडवणारी ही घटना मंगळवारी (दि.28) रोजी धोंडराई परिसरात घडली.
सध्या लॉकडाउन लागलेले असताना रस्त्यावर वाहनांची संख्या ही फारशी कमी झालेली आहे तरी पण काही शौकीन ड्रायव्हर आपल्या वाहनांचा वेग हा मर्यादेपेक्षा जास्त ठेवतात त्याचीच सजा बिचार्या मुक्या जिवांना भोगावी लागते.सुदैवाने गावातील तरुण इरफान शेख , संदीप निकम ,अफरोज शेख (मोट्या),भागवत टेकाळे यांनी त्या जखमी हरणावर उपचार करून रात्री त्याला गावातील जिल्हा परिषद शाळेत ठेवून वन विभागाशी संपर्क करुन जखमी हरणास वनविभागाच्या ताब्यात देऊन त्याचे प्राण वाचविण्याचे महान कार्य या तरुणांनी केले.यावेळी वनरक्षक डि.एस गाडेकर यांनी पाठवलेला प्राणीमित्र व सर्पमित्र बप्पा कानडे यांनी या जखमी हरणाला ताब्यात घेऊन शिरुर येथे भरती करण्यासाठी निघाले त्यावेळी त्यांना वाटेत खुप अडचणी आल्या शिरुर येथे जखमी हरिण घेऊन जाताना त्यांचा रिक्षा कोळगाव नजीक बंद पडला त्यावेळी कोळगाव येथील ग्रामस्थांनी बप्पा कानडे यांना वर्गणी गोळा करून स्कार्पिओ गाडी किरायाने करुण दिली व जखमी हरणास शिरूर येथे पोहचविण्यासाठी मदत करुन धोंडराई व कोळगाव करांनी एकप्रकारे माणुसकी जिवंत असल्याचे दाखवून दिले.
Leave a comment