बीड | वार्ताहर
बीडच्या अपर जिल्हाधिकारीपदी तुषार एकनाथ ठोंबरे तर अंबाजोगाईच्या अपर जिल्हाधिकारीपदी मंजुषा रामचंद्र मिसकर यांची पदोन्नतीने नियुक्ती करण्यात आली आहे.
बीड जिल्ह्यातील ही दोन्ही महत्वाची पदे मागच्या काही महिन्यांपासून रिक्त होती.मात्र आता या दोन्ही जागांवर अधिकाऱ्यांंच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. गत काही वर्षांत सातत्याने ही पदे रिक्त राहत आली आहेत. नियुक्ती झाली तरी अधिकारी इतरत्र बदली करुन घेत होते. त्यामुळेच मागील ८ महिन्यांहुन अधिक काळापासून ही पदे रिक्त होती. उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे याचा पदभार होता.आता बीड येथे तुषार ठोंबरे तर अंबाजोगाई येथे मंजुषा मिसकर यांची अप्पर जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
Leave a comment