मुख्यमंत्री सहायता निधीलाही केला धनादेश सुपूर्द
केज- वार्ताहर
तालुक्यातील सारणी (आ) येथील वीर हनुमान शिक्षण संस्थेचे संस्थापक स्व.पुरुषोत्तमदादा सोनवणे यांच्या पुण्यतिथी निमित्त सारणी (आ) व परिसरातील गरजू कुटुंबांना अन्नधान्य, किराणा वाटप करून तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी आर्थिक मदतीचा धनादेश तहसीलदार यांच्याकडे सुपूर्द करून अभिवादन करण्यात आले.
वीर हनुमान शिक्षण संस्थेचे संस्थापक स्व. पुरुषोत्तमदादा सोनवणे यांच्या पुण्यतिथी निमित्त दरवर्षी कीर्तनाचे व महाप्रसादाचे आयोजन केल्या जाते. मात्र यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्व.पुरूषोत्तम दादा सोनवणे यांचे सुपुत्र राहुल सोनवणे व त्यांच्या कुटुंबीयांनी परिसरातील गोरगरीब कुटुंबांना अन्नधान्य व १५ दिवस पुरेल एवढा किराणा वाटप केले तर आणखी वाटप करण्यात येणार आहे, तसेच पुण्यतिथी निमित्त कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत म्हणून आर्थिक मदतीचा धनादेश देखील केजचे तहसीलदार दुलाजी मेंढके यांच्याकडे सुपूर्द करून खऱ्या अर्थाने अभिवादन करण्यात आले.
यावेळी नायब तहसीलदार सचिन देशपांडे, युवा नेते पशुपतीनाथ दांगट, केज तालुका सक्रिय पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष सोनवणे, केज तालुका युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुजित सोनवणे, रविकांत सोनवणे, दत्तात्रय सोनवणे, सुरेश बापू सोनवणे, सुनिल सोनवणे, दिलीप सोनवणे, वैभव सोनवणे यांच्या सह कुटुंबियांची उपस्थिती होती.
Leave a comment