बीड । वार्ताहर
बीड जिल्ह्यात गुरुवारी अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयाच्या विलगीकरण कक्षात दाखल झालेल्या एका संशयिताचा स्वॅब तपासणीला पाठवला आहे. या अहवालाची आता प्रतीक्षा आहे. गुरुवारी बीड जिल्हा रुग्णालयात एकही संशयित दाखल झाला नाही.
जिल्ह्यात आतापर्यंत 189 जणांचे 203 स्वॅब तपासले, ते सर्व निगेटिव्ह आलेले आहेत. गुरुवारी दुपारी उशिरा अंबाजोगाईत एक संशयिताचा स्वॅब तपासणीला पाठवण्यात आला आहे. लातूर प्रयोगशाळेतून हा अहवाल प्राप्त होणार आहे. परजिल्ह्यातून आलेले 20 जण होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर 134 जणांना इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करण्यात आलेले आहे. याशिवाय 18 एप्रिलपासून गुरुवारी सायंकाळपर्यंत 32 हजार 951 ऊसतोड मजुर जिल्ह्यात परतल्याची नोंद जिल्हा आरोग्य विभागाकडे झाली असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिशन पवार यांनी दिली.
Leave a comment