सोमवारपासून संचारबदी शिथिलतेच्या वेळेत बदल
जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची माहिती
बीड । वार्ताहर
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात संचार बंदी व जमावबंदी आदेश लागू आहेत. या कालावधीत जीवनावश्यक वस्तूंच्या सेवा देणार्‍या आस्थापनांच्या सुरू ठेवण्यात येण्याच्या वेळांबाबत 6 एप्रिल 2020 पासून बदल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी लागू केले आहेत.
या आदेशानुसार जिल्ह्यातील बीड,अंबाजोगाई, परळी व माजलगाव या चार शहरांच्या हद्दीत वस्तूंच्या सेवा देणार्‍या अस्थापना विषम दिनांकास जसे 7, 9, 11 व 13 एप्रिल 2020 रोजी सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत चालू राहतील. तर या चार शहरांची हद्द वगळता उर्वरित जिल्ह्याचा भागांमध्ये या या सर्व जीवनावश्यक वस्तूंच्या सेवेत देणारा आस्थापना सम दिनांक जसे 8,10,12 व 14 एप्रिल 2020 रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत सुरू राहतील.
कोरोना विषाणू संसर्ग पसरू नये यासाठी जिल्ह्यात 14 एप्रिल 2020 रोजी रात्री बारा वाजेपर्यंत जिल्हाधिकारी यांनी निर्गमित केलेले विविध आदेश सुधारणा आदेश लागू आहेत . तसेच फौजदारी प्रक्रिया दंड संहिता 1973 चे कलम 144 नुसार प्रतिबंधात्मक आदेश लागू आहेत या कालावधीत जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणार्‍या वेळा आस्थापनांसाठी वरील सुधारित आदेश देण्यात आले आहेत.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.