आष्टी । वार्ताहर
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन सर्वतोपरि प्रयत्न करीत असून आपणही यास फुल ना फुलाची पाखळी अशी मदत म्हणून गुरुवारी आष्टी येथील धनश्री पतसंस्थेने मुख्यमंञी सहाय्यता निधीस तीस हजार रुपायांचा धनादेश आष्टी तहसिलदार निलीमा थेऊरकर यांच्याकडे सुपूर्द केला आहे.
आष्टी येथील नेहमी समाजकार्यात अग्रेसर असलेली धनश्रीपतसंस्थेने या कोरोनाचा पादुर्भाव रोखण्यासाठी मुख्यमंञी सहाय्यता निधीस मदत दिली आहे. या आगोदरही पतसंस्थेने शहरात सर्व शासकीय कर्मचार्यांना चारशे मास्क, सॅनिटायझर यांचे वाटप केले असून आज दि.30 रोजी आष्टीच्या तहसिलदार निलीमा थेऊरकर यांच्याकडे धनादेश सुपूर्द केला आहे. यावेळी अव्वल कारकुन आर.ए.पवार, पतसंस्थेचे सचिव जितेंद्र शिंदे, रमेश बोराडे, शांतीनाथ धोंडे, सय्यद ताहेर यांच्यासह आदि उपस्थित होते.
Leave a comment