मुंबई । वार्ताहर

विधानपरिषदेच्या 9 जागा रिक्त आहेत. त्यासाठी लवकरात लवकर निवडणूक जाहीर करावी, अशी विनंती महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पद टिकवण्यासाठी सभागृह सदस्यत्व मिळणं आवश्यक असताना ही विनंती राज्यपालांनी केल्याने राजकीय घडामोडींना उधाण येण्याची शक्यता आहे.

विधान परिषदेतल्या या 9 जागा 24 एप्रिलपासून रिक्त आहेत. Coronavirus च्या पार्श्वभूमीवर टाळेबंदी लागू झाल्याने निवडणुका होऊ शकल्या नाहीत. अधिवेशनही झालेलं नाही. लॉकडाऊनचा कालावधी 3 मे रोजी संपला की थोडी नियमांमध्ये थोडी शिथिलता येईल. त्यामुळे निवडणुकांची घोषणा करणं शक्य होईल, असंही कोश्यारी यांनी निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे, अशी माहिती राजभवनातून देण्यात आली.

ठाकरे यांना राज्यपाल नियुक्त रिक्त जागेवर आमदारकी मिळावी यासाठी सत्ताधारी पक्षांचे प्रयत्न सुरू असतानाच राज्यपाल कोश्यारी यांनी निवडणूक आयोगाकडे निवडणूक घेण्याची विनंती केली आहे. त्यामुळे भविष्यात नवीन राजकीय घडामोडींचे हे संकेत असल्याचं बोललं जात आहे.

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे विधानसभा आणि विधानपरिषद या दोन्हीपैकी कुठल्याच सभागृहाचे अद्याप सभासद नाहीत. त्यांना पदग्रहण केल्यानंतर सहा महिन्यात आमदारकी मिळवणं आवश्यक आहे. येत्या 27 मेपर्यंत ठाकरे आमदार म्हणून निवडून येणं आवश्यक आहे. नाहीतर राजकीय पेच निर्माण होऊ शकतो.

लाॅकडाऊन कालावधी 3 मे नंतर संपणार आहे त्यानंतर अनेक भागात शिथिलता दिली जाईल अपेक्षा राज्यपालांनी व्यक्त केली आहे. निवडणूक आयोग आता काय निर्णय घेतो यावर महाराष्ट्राचं आणि ठाकरे यांचं राजकीय भवितव्य अवलंबून आहे.

काय म्हटलं आहे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी?

करोना संकटाच्या काळात राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण होऊ नये, यासाठी विधानपरिषदेच्या निवडणुका घेण्यासाठी मा. राज्यपाल भगत सिंह कोश्यारीजी यांनी निवडणूक आयोगाकडे शिफारस करण्याचा जो निर्णय घेतला, त्याचे आम्ही स्वागत करतो.
संविधानाच्या तत्वांचे पालन करीतच मा. राज्यपालांनी हा निर्णय घेतला आहे. केंद्रीय निवडणूक आयोग या शिफारसीवर केंद्रीय गृहमंत्रालयाशी सल्लामसलत करून तत्काळ विधानपरिषदेच्या ९ जागांच्या निवडणुका घेण्याचा निर्णय करेल, हा आम्हाला विश्वास वाटतो.
शिवाय, यामुळे राज्यपाल नियुक्त सदस्यांनी मंत्री किंवा मुख्यमंत्री होऊ नये, या संकेतांचे सुद्धा पालन होईल. मा. मुख्यमंत्र्यांना आमच्या शुभेच्छा आहेत.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.