गेवराई । वार्ताहर
गुन्ह्याच्या अनुषंगाने राजपिंप्री (ता.गेवराई) येथे घटनास्थळाचा पंचनामा करुन परतत असणार्या पोलीसांच्या दुचाकीला अन्य एका दुचाकीने जोराची धडक दिली. यात दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले. बुधवारी (दि.29) तालुक्यातील गौडगाव-पांढरवाडी रस्त्यावर ही घटना घडली.
पोलीस हवालदार खरात व पो.कॉ. मस्के अशी जखमी पोलीस कर्मचार्यांची नावे आहेत. बुधवारी हे दोन कर्मचारी दुचाकीवरुन राजपिंप्री येथील एका गुन्ह्याच्या अनुषंगाने घटनास्थळ पंचनामा करण्यासाठी गेले होते. तेथील काम आटोपून ते पोलीस ठाण्याकडे येत असताना गौडगाव-पांढरवाडी रस्त्यावर समोरुन येणार्या दुचाकीने त्यांना धडक दिली.या अपघातात पोह.खरात यांच्या पायाची दोन बोटे फ्रॅक्चर झाली तर पोकॉ. मस्के यांनाही मुक्कामार लागला. याप्रकरणी दुचाकीचालक राजू राठोड विरुध्द गेवराई ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
Leave a comment