बीड । वार्ताहर
कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी महाराष्ट्रात दुसर्यांदा 14 एप्रिल ते 30 एप्रिल या कालावधीत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. त्याची मुदत आज 30 एप्रिल रोजी रात्री बारा वाजेपर्यंत संपत आहे, मात्र त्यानंतर राज्य शासनाच्या 17 एप्रिलच्या आदेशानुसार महाराष्ट्रात 3 मे पर्यंत लॉकडाऊनबाबत आदेश निर्गमित केले आहेत. या अनुषंगाने बीड जिल्ह्यातही 3 मे रोजी रात्री बारा वाजेपर्यंत हे सर्व आदेश लागू राहणार आहेत.
या अनुषगांने बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आज गुरुवारी (दि.30) नवे आदेश जारी केले असून यापुर्वीचे त्यांचे आदेश 30 एप्रिलपर्यंत लागू होते. आता ते 3 मेपर्यंत जिल्ह्यात लॉकडाऊन राहणार आहे. बीड जिल्ह्यात जीवनावश्यक वस्तूंच्या सेवा देणार्या सर्व आस्थापना या आदेशानुसार येत्या 1 मे व 3 मे रोजी दि. 13 एप्रिलच्या आदेशानुसार सकाळी 7 ते 9.30 या वेळेत चालू राहतील असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
Leave a comment