मुंबई। वार्ताहर
अभिनेते इरफान खान यांच्या निधनाचं दु:ख चित्रपटसृष्टीवर कोसळल्याला अजून २४ तास देखील झालेले नसताना आता सलग दुसऱ्या दिवशी चित्रपटसृष्टीला दुसरा धक्का बसला आहे. ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचं मुंबईमध्ये उपचारांदरम्यान निधन झालं आहे. ते ६८ वर्षांचे होते. त्यांच्यावर कर्करोगाचे उपचार सुरू होते. गेल्या दोन वर्षांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, अखेर त्यांची कर्करोगाची ही झुंज अपयशी ठरली असून त्यांचं आज सकाळी मुंबईतील सर एच. एन. रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयात उपचारांदरम्यान त्यांचं निधन झालं आहे. त्यांच्या निधनावर चित्रपट सृष्टीतून शोक व्यक्त करण्यात येत आहे. आपल्या कारकिर्दीत त्यांनी १५०हून जास्त भूमिका साकारल्या होत्या. यामध्ये त्यांच्या अनेक भूमिका अजरामर झाल्या.
१९५५ साली प्रदर्शित झालेल्या श्री ४२० या चित्रपटात त्यांनी प्यार हुआ इकरार हुआ या अजरामर गाण्यामध्ये एक छोटीशी भूमिका साकारून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. त्यानंतर १९७० साली आलेल्या मेरा नाम जोकर सिनेमामध्ये त्यांनी राजूच्या तरूणपणीची भूमिका साकारली होती. यासाठी त्यांना सर्वोत्तम बालकलाकाराचा नॅशनल फिल्म फेअर पुरस्कार मिळाला होता. मात्र, त्यांची प्रमुख भूमिकांची इनिंग सुरू झाली ती १९७३ साली प्रदर्शित झालेल्या बॉबी या सिनेमामधून. या सिनेमासाठी देखील त्यांना सर्वोत्तम अभिनेता म्हणून फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. अशा प्रकारे कारकिर्दीतल्या पहिल्या ३ सिनेमांमध्ये त्यांनी वडील राज कपूर यांच्या दिग्दर्शनाखाली काम केल्यानंतर त्यांनी पुढे अनेक दिग्दर्शकांसोबत काम केलं.
हे ट्वीट ठरलं शेवटचं
नुकतच ऋषी कपूर यांनी लॉकडाऊन दरम्यान पोलिस आणि डॉक्टारांवर होणाऱ्या हल्ल्याचा निषेध केला होता. हल्ला करणाऱ्यांन ऋषी कपूर यांनी चांगलेच सुनावले होते. आपण कोरोना विरूध्द लढाई जिंकुयात असं या ट्वीट मध्ये म्हटलं होतं.
स्वत:च्या लग्नात बेशुध्द पडलेले ऋषी कपूर, पत्नी नितू सिंग यांनी सांगितला किस्सा!
बॉलिवूड अभिनेते ऋषी कपूर यांचे मुंबईच्या हॉस्पिटलमध्ये निधन झाले. ऋषी कपूर यांच्या निधनामुळे त्यांचे मित्र महानायक अमिताभ बच्चन खूप दुखी आहेत. ऋषी कपूर अभिनेते म्हणून जितके चांगले होते तितकेच ते एक नवरा म्हणूनही उत्तम होते. खुद्द त्यांच्या पत्नी नितूंनी लग्नाचा एक किस्सा सांगितला आहे.ऋषी आणि नितू यांच लग्न २२ जानेवारी १९८०ला झाले. कपूर घराण्याच्या या लग्नात केवळ देशातील नाही तर परदेशातून अनेक लोकांनी हजेरी लावली होती. मात्र यावेळी असं काही घडलं की सगळेच खाबरले. एका मुलाखती दरम्यान नितू यांनी सांगितलेलं की लग्नाच्या वेळी ऋषी कपूर अचानक बेशुध्द पडले.नितू सिंग म्हणाल्या की, लग्नाच्यावेळी आम्ही दोघेही बेशुध्द पडलो. मात्र दोघांची बेशुध्द पडण्याची कारणं वेगवेगळी होती. मी ळग्नात घातलेला लेहंगा सांभळताना बेशुध्द झाले होते. तर ऋषी कपूर आपल्या आजूबाजूला असलेली गर्दी बघून बेशुध्द झाले होते. लग्नात झालेली गर्दी ऋषी यांना सहन झाली नाही आणि आणि ते बेशुध्द पडले. त्यानंतर शुद्धीवर आल्यावर आमचं लग्न लागलं.
‘राजमा चावल’ आणि ‘चांदनी चौक’शी अनोखं नातं
बॉलिवूड विश्व गेल्या 24 तासात 2 मोठ्या नावाजलेल्या कलाकारांना मुकलं आहे. इरफानने बुधवारी सकाळी जगाला निरोप दिला, त्यानंतर दुसऱ्याच दिवशी ऋषी कपूर यांच्या निधनाची दुखःद बातमी समोर आली. दरम्यान या दोन्ही दिग्गज कलाकारांचं दिल्लीशी अनोखं नातं होतं. हा देखील योगायोगच आहे. जिथे इरफान खानने नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून अभिनयाचे बारकावे शिकल्यानंतर वर्षानुवर्षे दिल्लीत थिएटर केले, तर ऋषी कपूर यांच्या बर्याच चित्रपटांचे चित्रीकरण दिल्लीमध्येच झाले आहे. त्यापैकी ‘चांदनी’ हा मुख्य चित्रपट असून याखेरीज ऋषी कपूर तीन वर्षांपूर्वी दिल्लीतील चांदनी चौक भागात आपल्या ‘राजमा चावल’ या चित्रपटाच्या शूटिंगसाठी थांबले होते.
Leave a comment