बीड । वार्ताहर
जिल्ह्यातील जमावबंदी व संचारबंदीच्या काळात ज्या कामांना सुट देण्यात आलेली आहे आणि भविष्यात सुट देण्यात येईल अशा सर्व कामांशी थेट संबंधित व्यक्तींना व कर्मचार्‍यांना पास
सध्या चालू असलेल्या र्लेींळव19.ारहरिेश्रळलश.ळप या वेबसाईटच्या आधारे घेता येतात असे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत; परंतु सदरील संकेतस्थळावर अर्ज करतांना संबधित शासकीय नियंत्रण अधिकार्‍याचे लेखी शिफारस असणे आवश्यक आहे. यासाठी नियंत्रण अधिकारी याच्या नियुक्त्या केल्या आहेत. जिल्ह्यातील बँकेमध्ये याप्रमाणे पास उपलब्ध असलेल्या व्यक्तींना देखील विषम तारखेस सकाळी 7 ते सकाळी 9.30 या वेळेतच बँकेशी संबंधित कामाला मुभा दिली जाते. या वेळे व्यतिरिक्त कोणत्याही सोई-सुविधा पास उपलब्ध केलेल्या व्यक्तींना देखील देण्यात येत नाही.जिल्ह्यतील सर्व बँकांनी याप्रमाणे पास उपलब्ध केलेल्या व्यक्तींना बँकेच्या सर्व सोई-सुविधा या संचारबंदी काळातही बँकेच्या कामकाजाच्या पूर्ण वेळेमध्ये उपलब्ध करून द्याव्यात.याआदेशासह यापूर्वीचे सुधारीत आदेश, सुधारणा आदेश अमंलात राहतील असे निर्देश दिले आहेत.
-----

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.