गेवराई । वार्ताहर

जिल्ह्यात संचारबंदीच्या कालावधीतही चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच असल्याचे दिसून येत आहे. गेवराई तालुक्यातील गढी येथील शिक्षक पतसंस्थेत चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात अज्ञाताविरूद्ध गेवराई ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

गढी येथे जवाहर शिक्षक कर्मचारी सहकारी पतसंस्था आहे. दि. 27 ते दि. 28 च्या मध्यरात्री चोरट्यांनी या पतसंस्थेच्या उत्तरदिशेचा बाजुने असलेल्या खिडकीचे ग्रील तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी एक इन्व्हर्टर, दोन 210 अ‍ॅम्पीयरच्या बॅटर्‍या तसेच 1 एलईडी टीव्ही असे 39 हजार रूपयांचे साहित्य चोरून नेले. दरम्यान पतसंस्थेत चोरी झाल्याचा हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर मारोती विश्‍वनाथ शिंदे यांनी  मंगळवारी गेवराई पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली. त्यावरून अज्ञातांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पो.ह. उबाळे या प्रकरणाचा तपास करत आहेत

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.