नांदूरघाट । वार्ताहर

कायदा व सुव्यवस्था अबाधित राहिला तरच कोरोनासारख्या संकटाला सामोरे जाणं शक्य होते. या लढाईमध्ये घरात बसून ही लढाई जिंकता येते. आपण आपली काळजी घ्यावी आपल्या परिवाराची घ्यावी अशी जनजागृती देखील पोलीस चौकीच्या नियंत्रणाखाली करण्यात आली होती. या जनजागृतीला भरपूर असा प्रतिसाद मिळाला आणि उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल प्राध्यापक सुभाष जाधव यांनी नांदूरघाट येथे येऊन जमादार मुकुंद ढाकणे यांचा सत्कार करून आभार मानले. 

यावेळी पोलीस नाईक शिवाजी सानप, पोलीस नाईक अतीश मोराळे, पोलीस नाईक सोनवणे, माजी उपसरपंच संजय नवले, प्रल्हाद देशमुख, पत्रकार श्रीकांत जाधव, प्रदीप जाधव, किशोर कानडे उपस्थित होते. दूरक्षेत्र नांदूरघाट अंतर्गत असलेले 32 गावे आहेत. त्यामध्ये कर्मचारी चार एवढ्या मोठ्या परिसरामध्ये नांदूरसारखे मोठी गावे, वाड्या-वस्त्या यांची शिस्तबद्ध पद्धतीने हाताळणी कोरोना संसर्गजन्य रोग असल्यामुळे शासनाने लावलेल्या लॉकडाऊनला चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिलेला दिसतो. हे सर्व श्रेय दूरक्षेत्र नांदूरघाट पोलीस चौकीचे जमादार मुकुंद ढाकणे, या कर्मचार्‍यांना सर्व श्रेय जाते.अशा भावना याप्रसंगी व्यक्त केल्या गेल्या. 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.