मुंबई |  । वार्ताहर

औरंगाबदमध्ये सामूहिक नमाजासाठी एकत्र आलेल्या नागरिकांनी पोलीस कर्मचाऱ्यांवर दगडफेक करून तीन कर्मचाऱ्यांना जखमी केलं. या घटनेवरून भाजप नेते निलेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे.

मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देऊन बांगड्यांचं दुकान उघडलं पाहिजे. पोलिसांनी किती सहन करत राहावं??? काय मर्यादा आहे की नाही. गुन्हे झाले की दोन-तीन कलमं लावून विषय विसरायचा आणि राज्य सरकार आम्ही कार्यवाही केली सांगून मोकळे होतं, असं निलेश राणे यांनी म्हटलं आहे.

बिडकीन येथील औरंगाबाद-पैठण रोडवरील संभाजीनगर मार्गावर असणाऱ्या अमिरनगर-प्रकाश नगर येथे मुस्लिम समाजातील काही लोकं धार्मिक स्थळी जमले होते. यासंदर्भातील माहिती मिळताच पोलीस तत्काळ घटनास्थली दाखल झाले. पोलीस उपनिरीक्षक राहुल पाटील काही पोलीस कर्मचाऱ्यांना घेऊन घटनास्थळी पोहचले आणि तेथील लोकांना समजवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यानंतर संतप्त जमावाने पोलिसांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली.

दरम्यान, नागरिकांनी केलेल्या दगडफेकीत एक पोलीस अधिकारी आणि दोन हवालदार जखमी झाल्याची माहिती आहे. या प्रकरणात पोलिसांनी 27 जणांना अटक केल्याचं कळतंय.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.