गेवराई । वार्ताहर
ग्राहकांच्या विश्वासाला पाञ राहुन अल्पवधीत नावलौकीक मिळालेल्या जगदंबा महिला नागरी सरकारी पतसंस्थेने मुख्यमंञी सहाय्यता निधीसाठी 31 हाजार रूपये दिले आहेत. नायब तहसिलदार अशोक भंडारी यांच्या कडे मंगळवार दि.28 रोजी सदरील रक्कमेचा धनादेश सपुर्द करण्यात आल्याची माहिती चेअरमन शिवनाथ मस्के यांनी दिली आहे.
देशात कोरोना सारख्या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन आहे. दरम्यान या काळात राज्य सरकारला कोरोना सारख्या माहामारीला हद्दपार करण्यासाठी जगदंबा महिला सहकारी पत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिवनाथ मस्के यांनी सामाजिक जाणिवेतुन संस्थेच्या वतीने मुख्यमंञी साहयता निधीसाठी 31 हाजार रूपये चा धनादेश नायब तहसिलदार अशोक भंडारी यांच्या कडे दि.28 मंगळवार रोजी सपुर्द केला. दरम्यान जगदंबा महिला पतसंस्थेच्या वतीने दि.18 रोजी गेवराई शहरातील बालाग्राम अनाथालयात राहणार्या अनाथ मुलांच्या उदरनिर्वाह साठी किराणा साहित्य दिले होते. जगदंबा महिला पतसंस्थेच्या वतीने अडचणी काळा मध्ये दाखवलेल्या सामाजिक जाणिवेचे सर्व स्थरातुन कौतुक होत आहे. यावेळी जगदंबा महिला पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिवनाथ मस्के, सचिव.प्रा.बाबु वादे, उपाध्यक्ष राम कु-हाडे, रवि काळे, भगवान अंतरकर, बाबासाहेब मस्के यांची उपस्थिती होती.
Leave a comment