माजलगाव:| वार्ताहर
शहरातील मुख्य रस्त्यावर 100%कर्फ्यु यशस्वी होत असताना दिसत असला तरी शहरातील विविध भागात गल्ली बोळात मात्र 20-25जणांचे थवे चे थवे ओट्यावर गप्पा मारताना दिसत असून कोरोना ला रोखण्यासाठी 3 ऱ्या टप्प्यात अधिक काळजी घेण्याची गरज असताना युवा तसेच प्रौढ वर्ग संचार बंदी व जमाव बंदीला हरताळ फास त असल्याचं चित्र माजलगाव मध्ये दिसत आहे
शहरातील जिजामाता नगर,शिवाजी नगर,मठ गल्ली,इदगा मोहल्ला,राज गल्ली,बिलाल मोहल्ला,अशोक नगर,दत्त कॉलनी सह पुनर्वसित शेलापुरी,देवखेडा,ब्रम्हगाव,खानापूर,चिंच गव्हाण आदी भागात दुपारी 5 ते रात्री 8 च्या दरम्यान शेकडो लोक हे रस्त्यावर दिसत असल्यामुळे मुख्य रस्ता वर जरी संचार बंदी अंमलात येत असली तरी गल्ली बोळात बसलेले थवे कोरोना चा धोका वाढवणारे आहे
चौकट
ग्रामीण भागात विहिरीवर गर्दी
ग्रामीण भागात खरात आडगाव,मोठे वाडी,गँगमसला,मोगरा,निपाणी टाकळी,आनंद गाव आदी सह ग्रामीण भागात विहिरी तसेच तलावात पोहण्यासाठी सकाळी 11 ते 2 युवक वर्ग गर्दी करत आहेत
Leave a comment