लोकप्रश्नने केले होते सावध 

 

 

माजलगाव : उमेश जेथलिया

  मराठवाड्यातील अनेक मल्टिस्टेट ऑक्सिजन वर असल्याचे खात्रीलायक वृत्ती दैनिक लोकप्रश्न ने 29नोव्हेंबर च्या अंकात प्रकाशित केले होते त्यानंतर एका मागोमाग अनेक मल्टिस्टेट दिवालखोरीत निघाल्या असून माजलगाव शहरातील मराठवाडा मल्टिस्टेट वर आज पहाटे गुन्हा दाखल करून सकाळी 11वाजता अध्यक्ष सतीश सावन्त यास अटक करण्यात आली आहे. तर  अधिकारी, कर्मचारी व संचालकांना अटक करण्यासाठी पोलीस मागवर आहेत.

 श्रीराम मच्छिन्द्र बहिर वय 44 या व्यापऱ्याने व त्यांच्या नातेवाईकणी बँकेत डिपॉजिट म्हणून ठेवलेले 5700000 सतावन लाख रु 3 ऑक्टोबर 2023 ला मुदत संपूनही परत देण्यासाठी टाळाटाळ केल्याप्रकरणी आज पहाटे गुन्हा दाखल करण्यात आला.शहर पोलिस गु र नंबर 17/2024 कलम 420,409,467,468,34 असे गुन्हे दाखल झाले आहे.
सदरील कामगिरी पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना तिडके सहाय्यक पोलीस अधीक्षक बी धीरजकुमार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ, पोलीस उपनिरीक्षक गजानन सोनटक्के केरबा माकने, जमादार संदीप मोरे, राम भंडाने महेश चव्हाण यांनी पार पाडली आहे.

   

जास्त अमिषाला बळी पडू नये 

 

 गुन्ह्याच्या अनुषंगाने माजलगाव उपविभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी बी धीरजकुमार यांनी आवाहन केले आहे की ठेवीदारांनी जास्त व्याजदराच्या आमिषाला बळी न पडता जेथे रक्कम सुरक्षित राहील त्याच ठिकाणी उदा. राष्ट्रीयकृत बँक आदी ठिकाणी आपले पैसे ठेवायला हवेत. तसेच त्यांनी सांगितले की नमूद प्रकरणांमध्ये कोणताही आरोपी सुटणार नाही आणि पीडितास पैसे परत मिळतील यासाठी पोलीस सर्वोत्तम तपास करणार आहे. 
  

 

संचालक मंडळात सावकार, राजीनामा दिला तरी आरोपी होणार 

 

 मराठवाडा अर्बन च्या संचालक मंडळात शहरतील मोठे सावकार असून या सावकारांनी बँकेचा पॆसा स्वतःच्या सावकारकी साठी वापरल्याचा ठेवीदाराचा आरोप आहे.या सर्व संचालकच्या घराची झडती घेऊन यांच्या बेकायदेशीर सावकारकीचा ही परदाफाश व्हावा अशी मागणी होत आहे.मागील 10 वर्षपासून संचालक म्हणून बँकेच्या पैशावर मजा मारणाऱ्या या संचालकांनी एक महिन्यापूर्वी राजीनामा दिला असला तरी ठेवीदाराने ठेवलेली ठेव व तिची मुदत राजीनामा देण्यापूर्वी असल्यामुळे सहकार कायदा्याने हे सर्व संचालक ही या प्रकरणात आरोपी म्हणून पकडले जावे अशी मागणी होत आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.