बीड | वार्ताहर

शहरातील विघ्नहर्ता मित्र मंडळाच्या वतीने रविवार (दि.२९) रोजी कोजागिरी पौर्णिमेनिमित्त विशेष महिलांसाठी गरबा-दांडिया कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमात जास्तीत जास्त महिलांनी सहभागी होऊन या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असे आवाहन विघ्नहर्ता मित्र मंडळाचे अध्यक्ष शुभम जोशी यांनी केले आहे.

विघ्नहर्ता मित्र मंडळाकडून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार मागील वर्षी मंडळाने गरबा-दांडिया हा कार्यक्रम प्रथमच आयोजीत केला होता. या मध्ये परिसरातील, शहरातील नागरिकांनी सहभागी होऊन कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद दिला. प्रतिसाद चांगला मिळाल्याने याही वर्षी मंडळाचे अध्यक्ष शुभम जोशी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. हा कार्यक्रम रविवार (दि.२९) रोजी विघ्नहर्ता चौक येथे (सायंकाळी ६ ते १०) या वेळेत पार पडणार आहे. या कार्यक्रमात पास शिवाय सहभागी होता येणार नाही. पाससाठी या नंबरवर 87671 34623 संपर्क साधा. आयोजित कार्यक्रमाचा आनंद जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष शुभम जोशी यांनी केले आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.