झाडे  काढण्यासाठी पोलिसांसह मजुराचा ताफा 

गेवराई पोलीसांची कारवाई 

धोंडराई |वार्ताहर 

तालुक्यातील धोंडराई येथे गेवराई पोलीसांनी गांजा शेतीवर मोठी कारवाई केली आहे.धोंडराई येथील शेतात लाखो रुपयांच्या गांजांची झाडे जप्त करण्यात आली आहे.तालुक्यातील धोंडराई शिवारातील सर्वे नंबर ४५२ मध्ये गणपत लक्ष्मण साखरे यांच्या शेतात कपाशी पिकामध्ये असलेल्या लाखो रुपये किमतीची गांजांची झाडे जप्त केली आहेत.कपाशी च्या शेतातील झाडे उपटण्याठी पोलिसांसह मजुरांचा ताफा लावण्यात आला होता.

धोंडराई शिवारातील शेतात गांजा असल्याची माहिती गेवराई पोलीसांना मिळाल्यानंतर गेवराई पोलीसांनी शेतात छापा मारत गांजाची एकुण ४६ झाडे ताब्यात घेत कारवाई केली आहे.गेवराई पोलीसांनी ही धडक कारवाई केली आहे.शेतकरी साखरे यांना पोलीसांनी ताब्यात घेतले असून गांजा चे वजन करण्याची प्रक्रिया सुरू आहे.सदरची कारवाई गेवराई उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू, पोलीस निरीक्षक धनंजय फराटे, यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश कोटकर , पोलीस हवालदार रामनाथ उगलमुगले,दत्ता उबाळे,राऊत,भिसे,जावळे,शेखर
हिंगावार,चालव खैय्युम खान यांनी केलीये

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.