माजलगाव | वार्ताहर
येथील माजी नगराध्यक्ष शेख मंजूर यांनी नगरपालिकेचे कर्मचारी शिवहर शेटे यांना १५ लाखाची खंडणी ,धमकी व फसवणुक केल्या प्रकरणी माजलगाव शहर पोलिसात बुधवार रोजी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माजलगाव नगरपालिकेचे नामांतर विभाग प्रमुख शिवहर चनबस अप्पा शेटे यांना शेख मंजूर यांनी १४ फेब्रुवारी २०१९ रोजी नगरपालिका कार्यालयात कामकाज करत असताना त्या वेळचे तत्कालीन नगरसेवक शेख मंजूर यांनी मला काही कामे करण्यासाठी सांगितले. मी सर्व कागदपत्रे तपासून नियमात बसत असतील तर मी काम करेल असे सांगितले यावेळी त्यांनी मला धमकावत हुज्जत घातली. तू सामान्य कर्मचारी आहे तुझी वाट लावतो , माझे न ऐकल्यास तुला जीवे मारील असे म्हणाले.त्यामुळे आमच्यात वाद सुरू असताना तत्कालीन नगराध्यक्ष सहाल चाऊस यांनी मला बोलवुन घेतले. यावेळी सहाल चाऊस यांच्यासमोर हा माझे काम कसे करीत नाही असे म्हणत त्याचा काटा काढील , त्याला सस्पेंड करील , त्याच्या तक्रारी करीन अन्यथा मला पंधरा लाख रुपये देण्यास सांगा असे शेख मंजूर म्हणाले.
त्यानंतर शेख मजुर यांनी शेटे यांच्या वेगवेगळ्या तक्रारी करण्यास सुरुवात केली व यांना त्रास देण्यास सुरुवात केली. यामुळे माझा परिवार भयभीत झाला होता. त्यानंतर मी जिल्हाधिकारी , पोलीस अधीक्षक यांच्याकडे याबाबत तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ यांनी ४ जुलै २०२३ बोलून घेतले व पुरावे देण्यास सांगितले. त्यानंतर शेटे यांनी सर्व पुरावे पोलिसांना दिल्यानंतर शहर पोलिस ठाण्यात शिवहर शेटे यांच्या फिर्यादीवरून शेख मंजूर शेख चाँद यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Leave a comment