कुंभार पिंपळगाव / अशोक कंटुले

कुंभार पिंपळगाव सह परिसरात गणपती उत्सव मोठ्या उत्साहात साजरे होणार. यंदा दुष्काळाचे सावट असले तरी गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी पूर्ण झालीआहे कुंभार पिंपळगाव येथील रुद्र आर्टच्या वाघमारे परिवारांनी आपल्या कलाकृतीतून रात्र-दिवस एक करून बप्पाच्या मूर्तींना आकर्षक रंग देऊन शिवतांडव ,तितली,तांडव ,लालबागचा राजा , पगडी गणपती, सिंहासन, दगडूशेठ हलवाई, बाल गणपती, बुद्धीप्रिय, बुद्धिविधाता, भालचंद्र अशा   बोलक्या,प्रसन्न मुद्रा,भाव दर्शक  वेगवेगळ्या गणपती बप्पा च्या मूर्ती बनवल्या आहेत. यावर्षी पाऊस काळ कमी असल्यामुळे बाजारपेठेत सर्वच आर्थिक व्यवहारावर परिणाम दिसून येत असून निरूउत्स्हा दिसत आहे. यामुळे गणपतीच्या मूर्तीकारांनी मूर्ती बनवण्याचा आपला मानस दरवर्षी पेक्षा कमीच ठेवलेला आहे. असे मूर्तिकारांनी म्हटले आहे. त्यामुळे बाजारात गणपत्तीबप्पाच्या  विक्रीसाठी येणा-या आकर्षक रंग, अलंकार,वस्र विभूषित मूर्ती फार कमी असणार आहेत. 


परंतु हिंदुधर्माच्या गौरी गणपतीची उत्पत्ती पारंपरिक हिंदू पौराणिक कथांमध्ये आढळते. हिंदू पौराणिक कथा असा दावा करते की भगवान गणपती, हत्तीचे डोके असलेले ज्ञान आणि समृद्धी देव आहे. परंतु गणेश चतुर्थी उत्सवादरम्यान, असे मानले जाते की त्यांनी देवी गौरी, देवी पार्वतीचे प्रकटीकरण केले. हा सण सुसंवाद आणि समृद्धीचे प्रतिनिधित्व करतो कारण भगवान गणपती आणि देवी गौरी यांचे मिलन बुद्धिमत्ता आणि सर्जनशीलतेचे सुसंवादी मिश्रण दर्शवते.
त्यामुळे गणपती उत्सवामध्ये मात्र भरभरून नवनवीन तंत्रज्ञान संकल्पना घेऊन उत्साह आनंद दरवर्षी वाढतच आहे.त्यामुळे बाजारात मूर्तिकारांच्या मूर्ती कमी व मागणी जास्त दरवर्षी वाढतच आहे. यावरून याही वर्षी गणपतीचा उत्सव मोठ्या उत्साहाणे साजरे होणार आहेत.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.