एमपीडीए कायद्यांतर्गत एसपींची कारवाई
बीड | वार्ताहर
सरकारी नोकरांवर हल्ला करणाऱ्या आणि नागरिकांना धमकावून वेगवेगळे गुन्हे करण्याच्या सवयीचा असलेल्या अंगद खंडु काळुसे (रा.महासांगवी ता. पाटोदा) यास एमपीडीए कायद्यांतर्गत औरंगाबाद येथील हरसुल कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले. 12 सप्टेंबर रोजी ही कारवाई करण्यात आली महत्वाचे हे की संबंधिताविरुद्ध यापूर्वी दोन वेळेस प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात आली होती; मात्र त्यानंतरही त्याच्यात बदल झाला नव्हता अखेर प्रशासनाने त्यास स्थानबद्ध केले आहे.
याबाबत पाटोदा ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक प्रताप नवघरे यांनी 23 मे 2023 रोजी आरोपी अंगद काळुसे यांच्या विरुद्ध एमपीडीए कायद्याअंतर्गत प्रस्ताव तयार करून तो पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्यामार्फत जिल्हा दंडाधिकारी दीपा मुधोळ यांच्याकडे सादर केला होता.
सदर स्थानबध्द आरोपीविरुध्द पोलीस ठाणे पाटोदा येथे सरकारी नौकरांवर हल्ला करणे, दुखापत करणे, घराविषयी आगळीक करणे, अवैद्यशस्त्र बाळगणे, खंडणी मागणे, जबरी चोरी करणे, दंगा करणे, दंडाधिकारी यांनी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन करणे, नुकसान करणे, जिवे मारण्याची धमक्या देणे, शिवीगाळ करणे वगैरे स्वरुपाचे 9 गुन्ह्याची नोंद पोलीस अभिलेखावर आहे. त्यापैकी 7 गुन्हे न्यायप्रविष्ट असून 2 गुन्हे अदखलपात्र स्वरुपाचे आहेत. सदरील व्यक्ती हा शरीराविरुध्दचे व मालाविरुध्दचे गंभीर गुन्हे करत असल्याने पोलीसांची त्याचेवर बऱ्याच दिवसांपासून करडी नजर होती. यापुर्वी पण सदर इसमाविरुध्द एमपीडीए कायद्याअंतर्गत कार्यवाही करण्यात आली होती. तसेच त्याचेवर यापुर्वी दोन वेळेस प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती. परंतु प्रतिबंधक कारवाईस न जुमानता त्याने चढत्या क्रमाने गुन्हे सुरूच ठेवले होते. त्याची पाटोदा शहरात व तालुक्यात दहशत आहे
या प्रकरणात जिल्हा दंडाधिकारी दिपा मुधोळ/मुंडे यांनी 12 जून 2023 रोजी रोजी सदर प्रकरणाच्या अनुषंगाने एमपीडीए कायद्याअंतर्गत आदेश पारीत करून सदर इसमास तात्काळ ताब्यात घेवून हर्सुल कारागृह औरंगाबाद येथे हजर करून स्थानबध करणे बाबत त्यांचे कडील आदेश पारीत केले होते. पोलीसांची अटक टाळण्यासाठी आरोपी 3 महिण्यापासुन स्वतःचे अस्तित्व लपवुन फिरत होता. तसेच पोलीसांना गुंगारा देत होता अखेर गोपणीय खबरेच्या आधारे पाटोदा पोलीसांनी त्यास ताब्यात घेवून पोलीस ठाणे पाटोदा येथे हजर केले व त्यानंतर योग्य पोलीस बंदोबस्तात हर्सल कारागृह, औरंगाबाद येथे 14 सप्टेंबर रोजी हजर करुन स्थानबध्द केले आहे.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकुर, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, उपविपोअ आष्टी धाराशिवकर, पो. नि. संतोष साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि मनिष पाटील, पोउपनि राहुल पतंगे, सचिन कोळेकर, सखाराम कदम, तवले, भागवत कुप्पे, गहिनीनाथ गर्जे सर्व पो.स्टे. पाटोदा तसेच पोह अभिमन्यु औताडे, संजय जायभाये, यादव सर्व स्थागुशा बीड यांनी केलेली आहे.
गुंडांवर होणार एमपीडीए
अंतर्गत कारवाई-एसपींचा इशारा
भविष्यातही वाळुचा चोरटा व्यापार करणारे तसेच जिवनावश्यक वस्तुचा काळाबाजार करणारे व्यक्ती यांचेवर व दादागिरी करणाऱ्या व खंडणी बहाद्दर धोकादायक गुंडावर गणेशोत्सवाच्या कालावधी दरम्यान जास्तीत जास्त एमपीडीए कायदयाअंतर्गत कठोर कारवाई करण्याचे संकेत पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकुर यांनी दिले आहेत.
Leave a comment