बीड | वार्ताहर
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांची येत्या 27 ऑगस्ट रोजी बीड शहरात जाहीर सभा होणार आहे. शहरातील छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणाच्या मैदानावर ही सभा होणार आहे.
या पार्श्वभूमीवर आज 18 ऑगस्ट रोजी राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष राजेश्वर चव्हाण, परळी नगरपालिकेचे गटनेते ज्येष्ठ नेते वाल्मीकआण्णा कराड , राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष बबन बाप्पु गवते, बीड विधानसभा मतदारसंघाचे नेते बळीराम आप्पा गवते, तालुकाध्यक्ष महादेव उबाळे, शहराध्यक्ष बाळासाहेब गुज्जर, युवक तालुकाध्यक्ष नंदकुमार कुटे, आप्पा इंदुरे, केशव तांदळे, सांगळे सर आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पाहणी केली. बीडमध्ये होणाऱ्या या सभेची आता जयत तयारी सुरू करण्यात आली आहे.
Leave a comment