कंपनीवर गुन्हा दाखल करुण नुकसान भरपाईसाठी दावा दाखल करणार..भाई ऍड.नारायण गोले पाटील
माजलगाव | प्रतिनिधी
काल दि.८जुलै २०२३रोजी भाई ऍड नारायण गोलेपाटील यांनी त्यांच्या कुटुंबियाच्या मालकी ताब्यातील माजलगाव शिवारातील गट क्रं.१२०मधील जमिनीत सोयाबिन (ग्रीन गोल्ड ३३४४ )या पिकाची पेरणी करणेकामी तिनं बॅग माजलगाव येथील मधुर कृषी केंद्रावर खरेदी केल्या व त्यांनी त्यांचे शेतात नेल्यानंतर पेरणी कामी त्या सोडल्या असता त्यामध्ये मृत पाल अढळुण आली.

त्यामुळे त्यांना २५ग्राम बियाणे कमी मिळाले आणि पेरणी कामी सहभागी झालेल्या त्यांच्या कुटुंबातील सदस्याच्या जीवितास कंपनीने धोका निर्माण केल्याचा आरोप करत ही बाब गंभीर असल्याचे त्यांचे म्हणणे आहे या शिवाय कंपनीने ग्रीन गोल्ड ३३४४ या कंपनीने जबाबदारीचे भान न ठेवता हईगयीने आणि निष्काळजी पणाने बियाणांची पॅकींग केली अनं त्यांच्या कुटुंबियांच्या जीवितास धोका निर्माण केला त्यामुळे त्यांचा कंपनीच्या बीयाणांच्यावर असलेल्या विश्वासाला तडा गेला आणी कंपनीने त्यांची व त्यांच्या कुटुंबियांची फसवणुक केली आहे.याबाबत कंपनीवर भा.द.वी.४२० सह इत्यादी कलमान्वये गुन्हा दाखल करुण नुकसान भरपाई मिळण्यासाठी जिल्हा ग्राहक मंचाकडे दावा दाखल करणार असल्याचे शेतकरी कामगार पक्ष माजलगाव चे नेते भाई ऍड.नारायण गोले पाटील यांनी सांगितले आहे.
ई-पेपर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a comment