डोंगरकिन्ही | वार्ताहर

बीड-डोेंगरकिन्ही । वार्ताहर
नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी पुण्याहून मारफळा (ता.गेवराई) येथे निघालेली स्कार्पिओ जीप आणि टेम्पोच्या भीषण अपघातात जीपमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य तिघे गंभीररित्या जखमी झाले. अपघाताची ही घटना 28 जून रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास बीड-कल्याण राज्य महामार्गावरील डोंगरकिन्ही जवळील जाटनांदूर फाट्याजवळ भिलारवाडी (ता.शिरुर) येथे जवळ घडली. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे. मयत वडवणी व माजलगाव तालुक्यातील आहेत.
जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांच्या माहितीनुसार, आसराबाई काशिनाथ कांबळे (वय 60 रा.नित्रुड, ता.माजलगाव), रमेश कुंडलीक हातागळे (वय 38 रा.कुप्पा. ता. वडवणी) आणि जीपचालक ताजोद्दीन मुजावर अशी मयतांची नावे आहेत तर अनिता रमेश हातागळे (वय 35) सविता दत्तात्रय हातागळे (वय 32), दत्ता कुंडलीक हातागळे (वय 45 सर्व रा.कुप्पा.ता.वडवणी )हे तिघे जखमी असून त्यांच्यावर बीड जिल्हा रूग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

 

बीड- कल्याण राज्यमहामार्गावरील जाटनांदूर (ता.शिरुर) जवळील घोडेवाडी येथे बीडहून नगरकडे टेम्पो (एम एच 21 बी. एच. 3820 ) निघाला होता.दरम्यान नगरहून गेवराई तालुक्यातील मारफळा गावाकडे किरायाच्या स्कार्पीओ जीपमधून (एम.एच. 12 एफ. के. 9010) सहा जण नातेवाईकाच्या अंत्यसंस्कारासाठी निघाले होते. बुधवारी सायंकाळी 5 वाजता एका वळणावर स्कार्पीओ आणि टेम्पोंची वळणावर समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात जीपमधील आसराबाई काशिनाथ कांबळे, रमेश कुंडलीक हातागळे व चालक ताजोद्दीन मुजावर हे ठार झाले. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर अंमळनेर पोलीस अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी रवाना झाले. सर्व जखमींना तातडीने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार सुरु केले. दरम्यान उत्तरीय तपासणीसाठी तिघांचे मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले.

वळणावर चालकाचे नियंत्रण सुटले

बीड- कल्याण राज्य महामार्गावरील एका वळणावर जीपचालक ताजोद्दीन मुजावर याचे नियंत्रण सुटल्यामुळे भरधाव स्कार्पीओ जीप या मार्गावरून येणार्‍या टेम्पोवर जावून धडकल्याने हा भीषण अपघात घडला. या अपघातामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती अशी माहिती अंमळनेर ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोरक्ष पालवे यांनी दिली.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.