बीड । प्रतिनिधी
शहरातील शुक्रवार पेठ भागातील सचिन घोडके या तरूणाचा बीड बायपासजवळ पाच दिवसापूर्वी अपघात झाला. या अपघातात त्याच्या मेंदुला अंतर्गत मार लागला आहे. बीडमध्ये त्याच्यावर उपचारासाठी तज्ञ डॉक्टर नसल्याने तातडीच्या
उपचारासाठी सचिन घोडके यास अहमदनगर येथील खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सदरील तरूणाची आर्थिक परिस्थिती हालाखीची असून तो घरातील कर्ता तरूण आहे. त्याच्या उपचारासाठी बीड शहर व जिल्ह्यातील दानशूर नागरिक, सामाजिक प्रतिष्ठाणच्या पदाधिकार्यांनी पुढे येवून मदत करावी असे आवाहन सचिन घोडके यांच्या मित्रपरिवाराने केले आहे.
सचिन गणेश घोडके असे त्या तरूणाचे नाव आहे. सध्या त्याच्यावर नगर येथील रूग्णालयात उपचार सुरू आहे. बीड बायपासजवळ झालेल्या अपघातात त्याच्या मेंदुला मार लागला आहे. त्याच्या उपचारासाठी लागणारा खर्च मोठ्या स्वरूपाचा आहे. घोडके परिवाराची आर्थिक स्थिती हालाखीची आणि मोठा खर्च झेपणारी नाही. त्यामुळे बीड शहरातील दानशूर नागरिकांनी, विविध राजकीय पक्ष संघटनांचे पदाधिकारी, सामाजिक प्रतिष्ठाणचे पदाधिकारी यांनी शक्य होईल तितकी अधिकाधिक आर्थिक मदत प्रशांत सुतळे मो.9890465041, सचिन जगदाळे 9172476741 या क्रमांकाच्या फोनपे/गुगलपे जमा करावी असे आवाहन मित्र परिवाराच्यावतीने करण्यात आले आहे.
Leave a comment