कारवाईत 25 जुगारी पकडले; बारा लाखांचा मुद्देमाल जप्त
अंबाजोगाई | वार्ताहर
शहरातील गवळीपुरा भागात पत्त्यावर पैसे लावून हारजीतचा झन्नामन्ना जुगार खेळणाऱ्या 25 जुगाऱ्याना छापा मारून रंगेहाथ पकडण्यात आले. सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्यासह त्यांच्या पथकाने 23 मे रोजी रात्री 10.30 वाजेच्या सुमारास ही कारवाई केली. जुगाऱ्यांकडून जुगार साहित्य, रोख रक्कम, मोबाईल, दुचाकी असा एकूण बारा लाख 17 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.या कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली.
अंबाजोगाई शहरात गवळीपुरा येथे पाशा चौधरी व रहेमान सुलेमान हे स्वतःच्या फायद्यासाठी राहत्या घरासमोर पत्र्याच्या शेडच्या बंद रूममध्ये काही लोकांना एकत्र बसवून झन्नामन्ना नावाच्या जुगाराचे पत्त्यावर पैसे लावून हारजितचा जुगार खेळ खेळत व खेळवीत आहेत अशी खात्रीलायक माहिती
सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळाली होती.
ही माहिती पोलिस अधीक्षक व अप्पर पोलीस अधीक्षक अंबाजोगाई यांना कळवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतः पंकज कुमावत, पोलीस उपनिरीक्षक आनंद शिंदे व त्यांच्या पथकातील पोलिस अंमलदार यांच्यासह रात्री 10.30 वाजता छापा मारला.यावेळी झन्नामन्ना जुगार खेळणारेे 24 लोक आढळले. त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातून नगदी रक्कम, जुगाराचे साहित्य, दुचाकी, मोबाईल, विदेशी दारु असा एकूण 12 लाख 17 हजार 600 रुपयांचा माल जप्त करण्यात आला.
या कारवाईत एकूण 25 आरोपीविरुद्ध पोह. राजू वंजारे यांच्या फिर्यादीवरून पोलीस ठाणे अंबाजोगाई शहर ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अप्पर अधीक्षक कविता नेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, पोउपनि आनंद शिंदे, पोलीस अंमलदार मुकुंद ढाकणे, राजू वंजारे, बालाजी दराडे, दिलीप गीते, गोविंद मुंडे, चालक शिंगारे, अंबाजोगाई शहर ठाण्याचे उपनिरीक्षक चांद मेंडके यांनी केली.
Leave a comment