बीड | वार्ताहर
अत्याचार प्रकरणात गुन्हा दाखल असलेल्या आरोपीने थेट जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आउट गेटजवळ येऊन स्वतःला पेटवून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला मंगळवारी रात्री साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली.
पोलिसांच्या माहितीनुसार, संदीप पिंपळे असे आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्याचे नाव आहे. या घटनेत तो भाजला आहे . माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला असे म्हणत त्याने अंगावर ज्वलनशील इंधन ओतून घेत स्वतःला पेटवून घेतले दरम्यान हा प्रकार पाहून पोलीस नियंत्रण कक्षातील पोलीस कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन त्याची आग विजवत त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले या घटनेची माहिती मिळताच जखमीला पोलिसांनी उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.स्वतः डीवायएसपी संतोष वाळके हे बीड जिल्हा रुग्णालयात दाखल झाले तर पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी करत पोलिसांना सूचना केल्या.
Leave a comment