बीड | वार्ताहर

मतदानाला अवघे दोन दिवस राहिले आहेत विरोधक एकत्र झाले असले तरी बाजार समितीसाठी बेजार झालेले आहेत दिसेल तिथे उकळण्याचा धंदा करण्यासाठी ही शेतकऱ्यांची संस्था तिचा बाजार होऊ देऊ नका,अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन करून माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी शेतकरी विकास पॅनलच्या सर्वच उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले आहे

कृषी उत्पन्न बाजार समिती बीड निवडणुक २०२३ च्या शेतकरी विकास पॅनल आयोजीत चऱ्हाटा पंचायत समिती गणामधील मतदारांची बैठक पिंपळवाडी येथे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी माजी आमदार जनार्दन तुपे, युवा नेते डॉ योगेश क्षीरसागर बँकेचे उपाध्यक्ष जगदीश काळे, विलास बडगे निवृत्ती डोके सखाराम मस्के बाळासाहेब इंगोले,अर्जुन बहिरवाळ, संग्राम तुपे, माजी नगरसेवक विनोद मुळूक सखाराम मस्के बालासाहेब जाधव सर्जेराव खटाणे आणि शेतकरी विकास पॅनलचे उमेदवार, आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक अर्जुन बहिरवाळ यांनी केले तर पॅनलच्या उमेदवारांना मतदान करण्याचे आव्हान सखाराम मस्के, निवृत्ती डोके, जगदीश काळे आणि डॉ योगेश क्षीरसागर यांनी केले, यावेळी माजी आमदार जनार्दन तुपे म्हणाले आज जे एकत्र आले त्यांनी एक वर्षांनी परत एकत्र येऊन दाखवावे, पायात पाय घालून एकमेकांचे उमेदवार पाडायचा हेच प्रयत्न करत आहेत जयदत्त आण्णा आम्हाला आदरस्थानी आहेत, मराठवाड्याला जयदत्त अण्णांशिवाय पर्याय नाही, स्वर्गीय विलासराव देशमुख आणि स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्यानंतर हा एकमेव नेता आहे, त्याला पाठबळ देण्याची गरज आहे चराटा भागातला विकास हा फक्त अण्णांच्या माध्यमातून झालेला आहे, मी स्वतः आमदार असताना अण्णांच्या माध्यमातून अनेक योजना राबवण्याचा प्रयत्न केला असून त्यांच्या नेतृत्वाखाली चालत असलेली बाजार समिती पोरा सोरांच्या हातात देऊ नका असे आवाहन त्यांनी केले


यावेळी बोलताना माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर म्हणाले की आज शेवटच्या टप्प्यातील मेळाव्यात देखील भरभरून पाठिंबा देण्यासाठी मतदार उपस्थित राहिले आहेत, दोन दिवसापासून अनेक गोष्टी कानावर येऊ लागले आहेत, शेतकऱ्यांची बाजार समिती ताब्यात घेण्याचे मनसुबे रचले जात आहेत, सहकारात अपयशी असणाऱ्या लोकांनी अभद्र युती करून शेतकऱ्यांच्या हक्काची संस्था लुटण्यासाठी सोम्या गोम्याचा खेळ सुरू केला आहे मात्र अफवांवर विश्वास ठेवू नका,चारा छावण्यात खाऊन,अवैद्य धंद्यात मिळवून पैशाच्या जोरावर निवडणुका लढणारी चार चौकडी सध्या बेजार आहे पण मतदार बहाद्दर आहेत मला विश्वास आहे तेही बाजार समिती पुन्हा एकदा आपल्याच ताब्यात राहील दिसेल तिथे उकळण्याचा धंदा इथे चालत नसतो हे लक्षात घ्यावे शेतकरी विकास पॅनलचे सर्व उमेदवार हे शेतकरी पुत्र आहेत ते शेतकऱ्यांना दगा देणारे नाहीत, त्यामुळे विरोधकांच्या भूलथापांना बळी पडून एका चांगल्या संस्थेचे नुकसान करू नका असे कळकळीचे आवाहन त्यांनी केले यावेळी ग्रामपंचायत सदस्य सेवा सोसायटीचे पदाधिकारी संचालक मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.