मोतीलाल कोठारी विद्यालयातील तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्रयोगांची रेलचेल

 

आष्टी : प्रतिनिधी
 
विज्ञान प्रदर्शन हे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सुप्तगुणांना दिशा देणारे एक व्यासपीठ आहे. त्याचा उपयोग करून विद्यार्थ्यांनी राज्य व देशपातळीवर आष्टीचे नाव उंचवावे. विद्यार्थ्यांची कल्पनाशक्ती व वैज्ञानिक दृष्टीकोन विकसित करण्याचे काम झाले म्हणजे शासनाचा उद्देश सफल होईल, असे प्रतिपादन गटशिक्षणाधिकारी सुधाकर यादव यांनी केले.
ते आष्टी तालुक्यातील कडा येथील मोतीलाल कोठारी विद्यालयात 50 व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन कार्यक्रमात बोलत होते. यावेळी व्यासपीठावर युवराज पाटील,उपसरपंच बाळासाहेब कर्डीले,संस्थेचे अध्यक्ष कांतीलाल चानोदिया,गोकुळदास मेहेर,मुख्याध्यापक नवनाथ पडोळे,प्राचार्य नंदकुमार राठी,ज.मो. भंडारी,विस्तार अधिकारी अर्जुन गुंड,बाबूशेठ भंडारी,शोभाचंद ललवाणी,सिद्धेश्वर शेंडगे,स्वानंद थोरवे,लक्ष्मण बोरसे,मथाजी शिकारे, पत्रकार राजेश राऊत,मनोज सातपुते,रघुनाथ कर्डीले, राजु तांगडे,आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना यादव म्हणाले की,विज्ञान प्रदर्शन हे विद्यार्थ्यांसाठी मोठी पर्वणी असते. या विज्ञान प्रदर्शनाचा भविष्यातील विद्यार्थ्यांच्या जीवनात व देशाच्या उज्वल भविष्यासाठी नक्कीच मोठा उपयोग होणार आहे. सध्या माहिती तंत्रज्ञान व खेळणी साहित्यद्वारे विज्ञान शिकवणे हा शासनाचा मूलभूत हेतू असून विद्यार्थ्यांनी विज्ञान शब्द कोडे तयार करून त्यामध्ये रममान व्हा. तसेच उत्कृष्ट विज्ञान शब्दकोड्यांना शिक्षण विभाग राज्यभर प्रसिद्धी देणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. जिल्हा व राज्यस्तरावर प्रयोग विज्ञान प्रदर्शनातून वेगवेगळे प्रयोग करण्याची ही विद्यार्थ्यांसाठी खूप मोठी संधी असते. विद्यार्थ्याकडून वेगवेगळे प्रयोग करून घेण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावेत. विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करून अनुभवातून प्रयोग करणे ही काळाची गरज असून अनुभवातून केलेले प्रयोग हे कायमस्वरूपी टिकून त्याचे परिणाम चांगले होतात. येणाऱ्या काळात नवीन शैक्षणिक धोरणामध्ये प्रयोगाला फार मोठे महत्त्व असून प्रयोगामुळे अनुभवातून अनेक शोध लावता येणार आहेत. ग्रामीण भागातही शास्त्रज्ञ घडविण्यासाठी विद्यार्थ्यांनी वेगवेगळे प्रयोग करण्याचे आवाहन यादव यांनी केले. यावेळी शिक्षणविस्तार अधिकारी अर्जुन गुंड यांनी विज्ञान प्रदर्शनाची संकल्पना स्पष्ट करून विज्ञान प्रदर्शनाचे फायदे विशद केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोप भाषणात मुख्याध्यापक नवनाथ पडोळे यांनी सांगितले की, मोतीराम कोठारी विद्यालयांमध्ये अनेक वर्षानंतर तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन होत असून सर्व सोयी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले आहेत .यापुढेही विज्ञान प्रदर्शन किंवा इतर शैक्षणिक उपक्रम राबविण्यासाठी संस्था तालुकास्तरावर सर्व  मदत करेल.
यावेळी आष्टी तालुक्यातील अनेक माध्यमिक व प्राथमिक शाळा सहभागी झाल्या होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बि.डी. चव्हाण यांनी केले तर आभार पुष्पलता जरे यांनी मानले.
 
 

पाठीवर कौतुकाची थाप....

 
शाळेतील लहान-लहान मुलांनी विज्ञान प्रदर्शनात तयार केलेले प्रयोग पाहून गटशिक्षणाधिकारी सुधाकर यादव यांच्या चेह-यावरचा आनंद काही लपून राहिला नाही.ते  चक्क तासभर विद्यार्थ्यांत  रमले.प्रत्येकाशी मुक्त संवाद साधला, त्यांच्या  पाठीवर कौतुकाची थाप टाकून प्रेरणा दिली.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.