बंदला उस्फूर्तपणे प्रतिसाद
कुंभार पिंपळगाव /अशोक कंटुले
घनसावंगी तालुक्यातील जांबसमर्थ येथील मागील आठ दिवसापूर्वी येथील श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या जन्मभूमीतील समर्थ पूजन करीत असलेल्या पंचधातूच्या श्रीराम ,लक्ष्मण सीता व हनुमान व स्वामी समर्थ भिक्षा मागताना जी हनुमानची मूर्ती आपल्या भिक्षा पात्र ठेवत ती हनुमानाची मूर्ती व बाजूबंद अशा पंचधातूच्या मूर्ती चोरट्यांनी लांब पास केल्या आहेत. या घटनेस आठ दिवस उलटले तरी पोलीस प्रशासनाला कुठलाही धागा धोरा न मिळाल्याने जांबसमर्थ येथील नागरिकांनी अन्नत्याग आंदोलनही केले. या घटनेबाबत पंचक्रोशीत सर्वांच्या मनात तीव्र निषेध असून या मुर्त्यांचा तपास पोलीस प्रशासनाने, शासनाने यावर कडक कारवाई करून तपास लावण्यात यावा. यासाठी कुंभार पिंपळगाव येथील हिंदुत्ववादी संघटना व व्यापारी महासंघाच्या वतीने ता.२९ सोमवार रोजी बाजारपेठ दिवसभर कडकडीत बंद ठेवून निषेध नोंदवला आहे. दरम्यान व्यापाऱ्यांनी सकाळपासून आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून सर्वांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला दिवसभर बाजारपेठेत शुकशुकाट दिसून आला.
रविवारी जांबसमर्थ येथे ग्रामस्थांच्या वतिनी बैठक घेण्यात आली. बैठकीला समस्त महिला ,पुरूष ,युवक,बालकांनसह येथील सासरी गेलेल्या मुली माहेरी येऊन आपला चोरून नेलेला राम परत आना म्हणुन उपासना करण्याचे आव्हान केले.
या वेळी गावातील सर्व ग्रामस्थ सर्व प्रतिष्ठीत नागरीक रामदास स्वामीचे ११ वे वंशज भुषण स्वामी जांबसमर्थचे भुषण यांच्या उपस्थितीत सर्वांच्या मार्गदर्शनाखाली महिलांनी ता.३० रोजी चुलबंद आंदोलन जांबसमर्थ येथे रामंदिरात करणार आहेत तर पुरूष मंडळी समस्त जांब येथील ग्रामस्त घनसांवगी पोलीस स्टेशनला घेरावा घालून ठिय्या आंदोलन करणार असल्याचा बैठकीत सर्वानुमत्ते निर्णय घेण्यात आला.
Leave a comment