बीड । वार्ताहर

 

शहरातील शिवाजीनगर ठाणे हद्दीतील गंगाधाम येथे राहणार्‍या पोलीस निरीक्षकांचे बंद घर फोडून चोरट्यांनी सोने-चांदीचे दागिणे आणि रोख रक्कम लंपास केले. 17 जुलै रोजी सायंकाळी हा प्रकार समोर आला.माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. श्वान पथक, ठसे तज्ञाना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. पंचनामा करुन रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

 

पोलीसांच्या माहितीनुसार,सुवर्णा राऊत यांचे जालना रोडवरील गंगाधाम येथे घर आहे. त्यांचे पती महादेव राऊत हे बीड पोलीस नियंत्रण कक्षात पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. शुक्रवारी राऊत कुटुंबीय त्यांच्या घराला कुलुप लावून त्यांच्या गावी गेले होते. 15 ते 17 जुलै दरम्यान चोरट्यांनी राऊत यांच्या घराचे कुलूप तोडून सोन्याचे व चांदीचे काही दागिणे तसेच कपाटातील काही रक्कम असा ऐवज लंपास केला. 17 रोजी सायंकाळी राऊत हे घरी परतले असता,त्यांना चोरी झाल्याचे निदर्शनास आले. माहिती मिळाल्यानंतर शिवाजीनगर ठाण्याचे उपनिरीक्षक प्रविण पाथरकर यांच्यासह डीबी पथकातील कर्मचारी तसेच ठसे तज्ञ आणि श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले.पोलीसांनी परिसरातील सीसीटिव्ही तपासले.आरोपींचा शोध घेतला जाईल असा विश्वास पोलीसांनी व्यक्त केला.

 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.