मृतकाला बेदम करून  दगडाने ठेचला चेहरा घात पात असल्याची शक्यता..?

भोकरदन / सुरेश गिराम

भोकरदन-जालना महामार्गालगत असलेल्या शेतात आज दि.19 शनिवारी सकाळी नऊ च्या दरम्यान एका वीस वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आल्याची घटना घडली आहे भगवान राजू तळेकर वय 20 वर्ष रा.उस्मानपेठ भोकरदन असे मृत तरुणांचे नाव आहे.सदरील घटनेची माहिती मिळताच भोकरदन पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते

सदरील प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी नऊच्या दरम्यान भोकरदन जालना मार्गावर एक अनोळखी मृतदेह पडलेले असल्याची माहिती मिळाली त्या वर पोलिसांचा ताफा घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असता त्या वेळी मृतकाची ओळख पटत नसल्याने तेथून मृतदेह ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले होते दरम्यान तपास लक्षात घेता मृतकाची ओळख न पटावी या करिता अज्ञात आरोपींनी  चेहऱ्यावर मोठ्या शत्र किंवा दगडाचा वापर झालेला असावा ? तर मृतदेह दिसून येऊ नये या करिता मृतदेहावर कापाशी च्या पळाट्या च्या गंजी मारल्या होत्या तर घटनास्थळी मृतकला बेदम मारून डोख्यात दगड घालून कोणी अज्ञातांनी या ठिकाणी आणून मृतदेह आणून टाकल्याचे समजत आहे आता या प्रकरणी पोलिसांन समोर  आरोपी तपासण्यासाठी एक आवाहन असणार आहे या वेळी सा.पोलीस निरीक्षक रत्नदीप जोगदंड सोबत सा. पो.नी. राजाराम तडवी पो.ना गणेश पायघन. पो.कॉ.अभिजित वायकोस आय बाईक पथक मध्ये शेख आसेफ तर दीपक इंगळे समाधान जगताप रामेश्वर सिनकर ईतर कर्मचारी घटनास्थळी उपस्थित होते दरम्यान मृतदेह ग्रामीण रुग्णालयात आणल्या नंतर तरुणाच्या खिशात असलेल्या आधार व लायसन्स मुळे तो भोकरदन मधील उस्मानपेठ आलापूर मधील असल्याचे निष्पन्न झाले आहे या वर मृतदेहाची शवविच्छेदन प्रक्रिया डॉक्टर करत असून पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले आहे

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.