जालना | वार्ताहर
तरुणांनो जीवन अनमोल आहे, व्यसन करू नका, चांगले जीवन जगा व आई वडील तसेच धर्माचे पालन करा, देशा विषयी व धर्मा विषयी स्वाभिमान बाळगा, मोठ्यांचे कार्य लक्षात ठेवा, जीवनात मोठे व्हायचे असेल तर शिवाजी महाराज व संभाजी राजे यांचा आदर्श डोळ्या समोर घेतला पाहिजे असे प्रतिपादन हभप पुरुषोत्तम महाराज पाटील यांनी कीर्तनातून बोलतांना केले ते डोंगरगाव सायगाव येथील श्रीक्षेत्र पावनधाम आश्रम येथे आयोजित भव्यदिव्य अखंड सप्ताहात बोलत होते,पुढे बोलतांना पाटील महाराज म्हणाले कि देशात सर्वात सुंदर वारकरी सांप्रदाय आहे परंतु आज पर्यंत महाराष्ट्रा बाहेर गेला नाही तरीही इतर सांप्रदाया पेक्षा सर्व श्रेष्ठ वारकरी सांप्रदाय आहे, तुकाराम महाराजांनी सर्व समान नागरी कायदा तेंव्हाच संप्रदायात आणला आहे त्यामुळेच सर्व जाती पंथाचे लॉक वारकरी संप्रदायात थोर संत होऊन गेले आहेंत,जीवनात धन डौलत पैसा किती हि कमवा परंतु त्याला काहीच महत्व नाही तुम्ह्चा वारसदार काय कार्य करतो याला महत्व आहे, सध्याच्या काळात माणसाचा देवावरील विश्वास कमी झाला आहे, देवावर विश्वास ठेवा तुम्ह्च्या वर कोणतेंच संकट येणार नाही, परमार्थात अडथला निर्माण करणारी वस्तू त्यागायला पाहिजे तेव्हाच करा परमार्थ व देवाची भक्ती होते, जगात असा एक हि माणूस नाही कि तो सुखी आहे, प्रत्येक माणसाच्या मागे कोणते ना कोणते दु;ख असते,सर्व गोष्टी देव देत नाही,कोना कडे पैसा खूप आहे पण बुद्धी नाही, कोन्हाला गुण आहे पण रूप नाही,प्रत्येक गोष्ट माणसाला मना सारखी मिळाली असती तर देवाला कोण्हीच मानले नसते, दुसर्याचे सुख पाहून जो दु;खी होतो तो सर्व सामान्य माणूस असतो, परंतु दुसरर्याचे दु;ख पाहून जो दु;खी होतात ते संत असतात, अन्न,मान, व धन हे ज्याच्या त्याच्या नशिबाने मिलते, कष्टाने पैसा मिळाला असता तर शेतकरी गरीब राहिला नसता, असे पाटील महाराजांनी बोलताना सांगितले या वेळी गुरुवर्य हभप प्रभाकर म,शास्त्री हभप उद्धव म.घनघाव, बद्रीनाथ म. शेळके, अरुण म. सिरसाठ यांची उपस्थिती होती तर पखवाज साथ सांगत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध तालमणी मृदंग सम्राट आळंदी निवासी हभप दासोपंत स्वामी व हभप शिद्धेश्वोर स्वामी, यांनी केली तर गायन साथ संगत हभप निवृत्ती म. लकडे, नागेश म. नानकील्ले, तुळशीराम म. दाभाडे, दादासाहेब म. पाटील, विठ्ठल म. काळे, रवींद्र म. मदने, शुभम म. घेवारे गणेश म. जाधव, गजानन म. मुळक, विलास म. देशमुख यांनी केली
Leave a comment