स्व.नगरसेवकाचे चिरंजीव जवारीवाले यांचा नगराध्यक्षांच्या उपस्थितीत प्रवेश

बीड | वार्ताहर

आ संदीप क्षीरसागर यांच्या आघाडीत पुन्हा बिघाडी होऊ लागली आहे,नगरसेवक स्व.खदीरभाई जवारीवाले यांचे चिरंजीव मोमिन खवी (सद्दाम) यांनी आपल्या असंख्य समर्थकांसह मा.मंञी जयदत्त (आण्णा) क्षीरसागर, नगराध्यक्ष डॉ.भारतभुषण क्षीरसागर, डॉ.योगेश (भैय्या) क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली जाहिर प्रवेश केला आहे,आघाडीला पुन्हा एक धक्का बसला आहे

बीड शहरात नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांच्या प्रयत्नातून अनेक विकासकामे सुरू आहेत. याच विकासकामामुळे नगराध्यक्षांच्या नेतृत्वात मोठ्या संख्येने सामाजिक, राजकीय कार्यकर्ते, पदाधिकारी, नगरसेवक प्रवेश होत आहेत. काल स्व खदीर जवारीवाले यांचे चिरंजीव मोमीन खवी (सद्दाम) यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत जाहीर प्रवेश केला.यावेळी नगराध्यक्ष आणि डॉ.योगेश भैया क्षीरसागर यांच्याकडून शहरात होत असलेल्या विकासकामांमुळे आपण प्रवेश केला असल्याचे मोमीन खवी यांनी सांगितले. नगराध्यक्षांनी मोमीन खवी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी नगरसेवक मुखीदभाई  लाला,गणेश वाघमारे,शेख इकबाल,माजी नगरसेवक शेख जमिल,सुलतान खान (बाबा), ॲड.सय्यद शाहेद,साजेद खान,नदिम ईनामदार,सय्यद इरशाद,अफ्रोज बागे,शेख अन्वर,बिलाल जहागिरदार, एम.डी.वसी,इम्रान बागे,मुस्सदीर खान यांच्यासह आदि.उपस्थित होते.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.