बदनापूर | संदीप पवार 

 तीर्थक्षेत्र योजनेतंर्गत बनलेल्या राजूर ते पैठण या दाभाडी ते बदनापूर या रस्त्याचे काम पूर्ण होऊन पुरते एक वर्ष झालेले नसताना या रस्त्याला मोठ-मोठे खडडे पडल्यामुळे कामाच्या दर्जावरच प्रश्नचिन्ह निर्माण होत असतानाच तालुक्यासह जिल्हयाचे कुलदैवत असलेल्या रेणुकामातेचा नवरोत्सव लवकरच सुरू होत असून भाविकांनाही या खराब व दर्जाहिन रस्त्याचा त्रास सहन करावा लागणार आहे.

बदनापूर तालुक्यातील सोमठाणा येथे जागृत व औरंगाबाद तथा जालना जिल्हयातील भाविकांचे श्रध्दास्थान व कुलदैवत असलेल्या रेणुकामातेचे पिठ आहे. सदरील ठिकाण नवसाला पावणारे म्हणून ओळखले जाते या ठिकाणी शारदीय नवरोत्सवानिमित्त्‍ नऊ दिवस मोठी यात्रा भरते या यात्रेला नऊ दिवस काही भाविक सोमठाणा गडावर मुक्कामी राहून देवीची आराधना करतात या ठिकाणी नऊ दिवस मोठा उत्सव, कीर्तन आदी कार्यक्रमांची रेलचेल असते. त्याचप्रमाणे या देवीच्या मंदिरात जाण्यासाठी पंचक्रोशीतील भाविक दररोज सकाळी पायी सोमठाणा गडावर जात असतात. मात्र, या ठिकाणी जाणारा रस्तयाला प्रचंड खडडे पडल्यामुळे भाविकांना मोठा त्रास सहन करावा लागू शकतो. सदरील रस्ता पर्यटन विकास योजनेतंर्गत राजूर ते पैठाण या महत्त्वाकांक्षी योजनेतून बनलेले आहे. सदरील रस्ता राजूर ते बदनापूरपर्यंत एका ठेकेदाराकडे तर बदनापूर ते पाचोड दुसऱ्या ठेकेदाराकडे तयार करण्यासाठी देण्यात आलेला होता. राजूर ते बदनापूर (सोमठाणा फाटा) पर्यंतचा रस्ता बनवणाऱ्या ठेकेदाराने मागीलच वर्षी काम पूर्ण केलेले असताना या रस्त्याला एका वर्षाच्या आत प्रचंड मोठमोठे खडडे पडल्यामुळे रस्त्याच्या कामाच्या दर्जाबाबत व त्याला मंजुरी देणाऱ्या प्रशासनातील अधिकाऱ्यांबाबतच शंका उत्पन्न होत आहे. वास्तविक बदनापूर ते पाचोड रस्ता व बदनापूर ते राजूर रस्त्याची तुलना केली तर लगेचच या रस्त्याच्या कामात झालेला हलगर्जीपणा उघडकीस येऊ शकतो. मात्र सदरील ठेकेदार राजकीय पक्षाशी निगडीत असल्यामुळे त्याच्या कामाची चौकशी करण्याची मागणी बदनापूरचे विकासपुरुष म्हणून ओळख असलेल्या आमदार नारायण कुचे हेही करत नसल्याची चर्चा भाविकांत आहे. एका वर्षात उखडलेल्या रस्त्यामुळे नवरात्रोत्सवासाठी सोमठाणा गडावर जाणारे भाविक मात्र या निमित्ताने ठेकेदार व त्यांना अभ्य देणाऱ्या राजकीय नेत्यांना चांगलेच “धन्यवाद” देत असतील यात शंकाच नाही. सदरील रस्त्यावरील एका वर्षाच्या आत पडलेले खडडे तात्काळ बुजवून रस्ता दुरुस्ती करण्याची मागणी या निमित्ताने जोर धरत आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.