धोंडराई / वार्ताहर
तालुक्यातील भोजगाव येथील अमृता नदीवरील पुल गेल्या काही वर्षांपासून पुराच्या पाण्याने वाहुन गेलेला आहे परिणामी भोजगाव येथील संपुर्ण दळणवळण पुलाअभावी बंद आहे तर याच वाहुन गेलेल्या पुलाने गावातील दोघां जणांचा बळी देखील घेतलाय तरी मात्र हा पुल दुरुस्त होत नाहीये. रविवार रोजी गावातील तरुण सुदर्शन संत यांचा या पुलाच्या कठड्यावरुन घसरून अमृता नदीत पडल्याने वाहुन मृत्यू झाला संतप्त नागरिकांनी व ग्रामस्थांनी मृतदेह रस्त्यावर ठेवत रस्ता बंद केला तसेच गावातील महिलांनी उपविभागीय
अधिकारी नामदेव टिळेकर यांना गाव पहायला चला असे म्हणत घेरावही घातला होता या सर्व घटनेनंतर बीड चे जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी बुधवार रोजी सायंकाळी भोजगाव येथे दाखल होत मृत तरुणांच्या कुटुंबियांची भेट घेत नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनातुन चार लाख रुपयांची मदत केली आहे मदतीचा धनादेश हा जिल्हाधिकारी शर्मा यांनी स्वत: कुटुंबीयांना दिला आहे. शर्मा यांनी वाहुन गेलेल्या पुलाची पाहणी करत पुल लवकर दुरुस्त करण्यात येईल असे सांगितले तर गावकऱ्यांनी भोजगावचे पुनर्वसन जवळच असलेल्या गायरानामध्ये करण्याची मागणी केली. जिल्हाधिकारी हे ट्रॅक्टर मध्ये बसुन भोजगावमध्ये दाखल झाले होते.बऱ्याच दिवसांपासून नादुरुस्त असलेला पुल जिल्हाधिकारी यांच्या
पाहणीनंतर तरी आता दुरुस्त होईल की नाही असा प्रश्न पडतोय. मात्र भोजगाव येथे दरवर्षी या पुलामुळे वाइट दुर्घटना घडत असुन लोकप्रतिनिधी फक्त आपापसातील मतभेदात व्यस्त असल्याचे दिसून येत आहे त्यांच्या या मतभेदांमुळे तालुक्यातील जनता मात्र नरकयातना भोगवत असल्याचे दिसून येत आहे.जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्या समवेत उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर, नायब तहसीलदार शामसुंदर रामदासी, मंडळ अधिकारी, ग्रामसेवक , सरपंच विष्णु आडे ,दत्ता संत ,कृष्णा संत, शैलेश संत, रावसाहेब शिंदे आदी ग्रामस्थ उपस्थित होते
Leave a comment