बीड \ प्रतिनिधी

येथील जालना रोडवरी आनंदऋषीजी नेत्रालय व्हिजन सेंटर येथे आनंदऋषीजी नेत्रालय अहमदनगर व झुंबरलाल खटोड सामाजिक प्रतिष्ठान यांच्या सौजन्याने येत्या 26 सप्टेंबर 2021 रोजी मधुमेही रुग्णांसाठी मोफत नेत्र पटल (रेटिना) तपासणी शिबीर आयोजित करण्यात आली आहे. बीड शहर व जिल्ह्यातील नागरिकांनी नाममात्र दरात नाव नोंदणी करुन यास तपासणी शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन खटोड सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने गौतम खटोड व पदाधिकार्‍यांच्या वतीने करण्यात आले आहे.



आनंदऋषीजी नेत्रालय व खटोड प्रतिष्ठानच्या वतीने यापूर्वीही बीड शहरातील जालना रोडवरील आनंद ऋषीजी नेत्रालय व्हीजन सेंटर येथे मोफत नेत्र तपासणी व चष्मे वाटप व तसेच अल्पदरात नेत्र शस्त्रक्रिया करुन अनेक गरजुंना नव्याने द़ृष्टी दिली गेली आहे. आता येत्या 26 सप्टेंबर रोजी मधुमेही रुग्णांसाठी मोफत नेत्र पटल तपासणी शिबीर आयोजित करण्यात आली आहे. 26 सप्टेंबर रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 या दरम्यान हे शिबीर संपन्न होणार आहे. याच दिवशी रुग्णांना मोबाईल क्रमांक 7796670782 येथे नाव नोंदणी करता येणार आहे. जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिकांनी या शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन गौतम खटोड यांनी केले आहे. या शिबीरात नजर तपासणी, नेत्र पटल तपासणी, नेत्रपटल तज्ञांकडून समुपदेशन आणि मोफत ब्लड शुगर तपासणी होणार आहे.

 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.