भोकरदन / वार्ताहर

भोकरदन पंचायत समितीच्या नळणी बुद्रुक गणातील भारतीय जनता पक्षाच्या महिला सदस्या पुष्पा गजानन जाधव वय ३५ रा.नळणी बुद्रुक यांनी  राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज दि 10 रोजी  सकाळी घडली असून  मिळालेल्या माहितीनुसार नळणी पंचायत समिती गणाच्या सदस्या पुष्पा जाधव या परिवारासह तालुक्यातील नळणी बुद्रुक येथे राहतात. गुरुवारी (ता.नऊ) त्यांनी नेहमी प्रमाणे रात्री पती गजानन जाधव व दोन मुलांसह जेवण केले. त्यांनतर त्यांचे पती गजानन जाधव व मुलगा घरासमोरील ओट्यावर, तर मुलगी शेजारी काकांच्या घरी झोपायला गेली होती. त्यामुळे पुष्पा जाधव या घरात एकट्याच झोपल्या होत्या. यादरम्यान मध्यरात्रीनंतर त्यांनी दोरीच्या साहाय्याने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी ज्या वेळेस गजानन जाधव हे झोपेतून उठून घरात गेले. त्यावेळी त्यांना पुष्पा जाधव या गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आल्या. गजानन यांनी आरडाओरड केली असता शेजारी जमा झाले. या घटनेची माहिती भोकरदन पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक रत्नदीप जोगदंड यांना देण्यात आली. त्यांनी तातडीने पोलिस उपनिरीक्षक बी.डी.कुटुंबरे व इतर कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाठवून पंचनामा केला. दरम्यान आत्महत्याचे कारण समजू शकले नाही. या प्रकरणी भोकरदन पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, येथील ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी करून पुष्पा जाधव यांच्या पार्थिवावर नळणी बुद्रुक येथे शुक्रवारी दुपारी तीन वाजता शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा, एक मुलगी, दीर, भावजाई, पुतणे असा परिवार आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.