बीड जिल्ह्यामध्ये 50 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्यानंतर पंचनामे करण्याची काय गरज
आष्टी । वार्ताहर
गतवर्षी बीड जिल्ह्यामध्ये 5, 6 आणि 7, 8 यापैकी 5, 6 आणि 8 या तारखेला 50 महसूल मंडळांमध्ये जवळपास 65 एम एम एम का मोठा पाऊस झाल्याने या भागातील खरिपाची सर्व पिके मुग वडीद,तुर असेल असेल कापूस असेल सोयाबीन असेल सर्व पिके पाण्याखाली जाऊन अक्षरशः सोडून गेलेआहेत. अशा परिस्थितीमध्ये हे प्रशासन पंचनामा करण्याच्या भानगडीत पडत आहे. कसले पंचनामे करता 50 मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्यानंतर सरसकट शेतकऱ्यांना खरिपाची अनुदान वाटप करा. असे बीड उस्मानाबाद लातूर विधान परिषदेचे सदस्य आमदार सुरेश धस यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारवर घणाघाती टीका केली. जवळपास 50 महसुल मंडळांमधील खरीपाचे सर्व पिके वाया गेली आहेत. गेल्या दोन वर्षापासून या राज्य सरकारने शेतकऱ्याला एकही छदाम देण्याचे काम केले नाही केवळ आणि केवळ केंद्राचे नरेंद्र मोदी यांचे 2000 शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत आहे. गेल्या दोन वर्षात कसला पिक विमा ही नाही कसले अनुदानही नाही त्यामुळे गतवर्षी शेतकऱ्यांनी पीक विमा देखील भरला नाही अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना आता मदतीची गरज आहे .आणि हे कुठे ड्रोन लावतो आणि पंचनामे करतो कसले पंचनामे करता सरसकट कोकणाच्या धर्तीवर मदत द्या नसता आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल. असा इशारा आमदार सुरेश धस यांनी पत्रकार परिषदेमध्ये सरकारला दिला. चिंचपूर ते साबलखेड पर्यंतचा रस्ता हा मी गडकरी साहेब यांच्या कडून मंजूर करून घेऊन तयार करून घेतला. आहे जो खराब रस्ता आहे . विद्यमान आमदार ऊठसूट केंद्राकडे बोट दाखवत आहेत मग त्यांचे सरकार आत्यांनी आता राज्याकडून निधी आणून हा रस्ता पूर्ण करावा आमदार बाळासाहेब आजबे यांचे नाव न घेता आमदार नदीवर बंधा-यावर फिरून शेतकऱ्याचे नुकसान दिसत नसते . त्यासाठी शेतात उतरावे लागते.असे आमदार धस म्हणाले तसेच या रस्त्याला पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यावर बेशरम चे काही लोकांनी खड्ड्यात झाड लावून देखील, यांना कसली शरम वाटायला तयार नाहीत धस म्हणाले. गेल्या दोन वर्षात करोणा च्या नावाखाली त्रेधातिरपीट झालेले सरकार आता देखिल नसते घोषणा ची अतिवृष्टी करत आहेत .मात्र अद्याप पदरात कसलेच काही यांना आमदार फंड व 25 15 कामांसाठी निधी द्यायला पैसे आहेत मात्र शेतकऱ्यांसाठी यांच्याकडे पैसे नाही .अशी यांची अवस्था झाली आहे.
Leave a comment