दोन मुली दगावल्या : तर आईवरही उपचार सुरू
--------------------------------------------------------
केज |वार्ताहर
केज तालुक्यातील सोनेसांगवी नं. २ येथे अत्यंत हृदयद्रावक घटना घडली असून एकाच कुटुंबातील दोन मुली व आईला सर्पदंश झाला. त्यात दोन्ही मुली दगावली असून आईवर उपचार सुरू आहेत.
या बाबतची माहिती अशी की, ८ सप्टेंबर रोजी मध्यरात्री सुमारे १२:३० वा. च्या दरम्यान सोनेसांगवी नं. २ ता. केज येथील दीपक साखरे यांच्या कुटुंबातील सौ.जयश्री दीपक साखरे वय (३० वर्ष) कु. स्वप्नाली दीपक साखरे वय ४ वर्ष, कु. स्वीटी दीपक साखरे वय (३ वर्ष) या तिघी मायलेकींना त्यांच्या घरात झोपलेल्या असताना विषारी साप चावला. त्यात स्वप्नाली साखरे व स्वीटी साखरे या दोन्ही चिमुकल्या जागीच गतप्राण झाल्या. तर त्यांची आई सौ. जयश्री साखरे यांच्यावर अंबाजोगाई येथील स्वामी रामाननंद तिर्थ ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय अंबाजोगाई येथे उपचार सुरू आहेत. एकाच कुटुंबातील तिघांना सर्पदंश होऊन दोन चिमुकल्यांचा जीव गेला ही अत्यंत दुःखद आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना आहे.
Leave a comment