नेकनूर | वार्ताहर

 

   रात्री दारूच्या नशेत आईला मारहाण केल्यानंतर सकाळी तिचा जीव गेल्याचे लक्षात येताच पळून चाललेला मुलगा दीड तासाचा पाठलाग करीत शहागड जवळ ताब्यात घेण्यात एपीआय लक्ष्‍मण केंद्रे यांना यश आले.  चौसाळा येथील प्रयागबाई पांडुरंग मानगिरे वय70 महिलेचा मुलाच्या मारहाणीत मृत्यू झाल्याची खबर सकाळी नेकनुर पोलिसांना मिळाल्यानंतर एपीआय लक्ष्मण केंद्रे यांनी सूत्रे हलवत पीएसआय  विलास जाधव यांना घटनास्थळी रवाना करून स्वतः पळून चाललेल्या मुलाच्या दिशेने निघाले  बीड, गेवराई मार्गे महाकाळ येथे सासुरवाडीकडे संशयित आरोपी मदन पांडुरंग मानगिरे वय 28 पळून जात असल्याची खबर असल्याने विलंब न करता स्वतः च्या खाजगी वाहनाने त्याचा पाठलाग करत शहागडच्या जवळ त्याला दुचाकी वरून ताब्यात घेतले. आरोपी सोबत लहान मुलगा होता त्यांना नेकनूर पोलिस स्टेशन ला आणले आहे. मृत महिला दारू पित असल्याचे बोलले जात असून याला विरोध करीत मुलाने मारहाण केल्याच्या बोलले जात आहे शवविच्छेदन अहवालानतर गुन्हा नोंद केला जाणार आहे प्रथमदर्शी माहितीनुसार मुलाच्या माराने महिलेचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.