अपघातात शिंदी येथील एक जण ठार तर दोन मुले गंभीर जखमी

 

अनंत जाधव /मस्साजोग 

 

केज-माजरसुंबा लगत असलेल्या  उमरी फाट्याजवळ चार चाकी कार व मोटारसायकल चा भिषण अपघात झाल्याची घटना दिनांक १६ ऑगस्ट सोमवार रोजी संध्याकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. तरी* 

   या बाबत ची अधिक माहिती अशी की  या अपघातात  मोटारसायकलस्वाराचा जागीच मृत्यू व दोन मुलगी आणि मुलगा गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.
 केज- माजरसुंबा महामार्गा लगत असलेल्या  उमरी फाट्या जवळ चार चाकी कार व मोटारसायकलचा अपघातात श्याम सय्यद वय ३५ वर्षे रा.शिंदी  ह्या इसमाचा मृत्यू झाला तर मुस्कान श्याम सय्यद वय १२ वर्षे  व  अमिन मैनोदीन सय्यद वय १४ वर्षे,  हे दोन्ही मुलगा आणि मुलगी  गंभीर जखमी  झाल्याची घटना घडली आहे. दोन्ही गंभीर मुलांना तात्काळ केज येथील उपजिल्हा रुग्णालयात   उपचारासाठी दाखल करण्यात आले असता डॉ.सावंत यांनी प्रथोमोपचार करून त्यांना अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ जिल्हा रुग्णालयात  पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.
सदरील अपघात नेमका कसा झाला हे अद्याप स्पष्ट झाले नाही.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.