अभिलेखामधील नोंदी रद्द करण्याचे आदेश

बीड । वार्ताहर

शहरासह जिल्ह्यातील मंदिर, दर्गा आणि मस्जिद यांना मिळालेल्या ईनामी जमिनी परस्पर नावावर करण्याचा उद्योग भूसुधार विभागातील अधिकारी,कर्मचार्‍यांनी संगणमताने केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या संदर्भात विविध तक्रारी प्राप्त झाल्यानंतर आता भू-सुधार उपजिल्हाधिकारी प्रकाश आघाव यांनी अभिलेख्यांमधील नोंदी रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच सातबार्‍यावर नोंद असल्याशिवाय कोणालाही परस्पर जमिनी नावावर करता येत नसल्याचेही त्यांनी आदेशात स्पष्ट केले आहे.

बीड तालुक्यातील आणि जिल्ह्यातील सन 2018 मधील व त्यापूर्वी देवस्थान व दर्गा इनामी जमिनी खालसा करण्यासाठी सरकारने काढलेल्या आदेशाचा गैरवापर करत तत्कालीन मंडळाधिकारी नरहरी शेळके व इतर अधिकार्‍यांनी ईनामी जमिनीबाबतचे बोगस आदेश आणले. त्याआधारे अधिकार अभिलेखामध्ये संबंधित तलाठी व मंडळाधिकारी नोंद घेत होते. याबाबत भू-सुधार विभागाकडे अनेक तक्रारी प्राप्त झाल्या. यामध्ये वासनवाडी, नामलगाव, पालवण, बलगुजार,बीड, खापरपांगरी व जिल्ह्यातील इतर देवस्थान, मस्जिद आणि दर्ग्याच्या जमिनी बोगस आदेश काढून खालसा करण्याचे काम केले जात होते. सन 2018 मधील आदेशाची अंमलबजावणी मागच्या तारखेमध्ये दर्शवून त्याआधारे या इनामी जमिनीच्या नोंदी परस्पर संबंधित परस्पर व्यक्तीच्या नावावर केल्या जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. गतवर्षीपासून ईनामी जमिनीबाबतच्या अशा बोगस नोंदी घेतल्या गेल्या असल्यास आणि फेरफार केले असल्यास ते उपविभागीय अधिकार्‍यांनी तात्काळ रद्द करण्याची सूचनाही उपजिल्हाधिकारी आघाव यांनी केली आहे.त्या-त्या महसूलचे तहसीलदार, मंडळाधिकारी आणि तलाठी यांनीही आपल्या तालुक्यात आणि मंडळामध्ये अशा बोगस नोंदी झाल्या असतील तर त्या नोंदी उपविभागीय अधिकार्‍यांच्या निदर्शनास आणून सदरील फेरफारांचे पुर्नविलोकन रद्द करुन घेत तसा अहवाल उपजिल्हाधिकारी भू-सुधार कार्यालयाला पाठवावा. यामध्ये बोगस नोंदी करणार्‍यांना तलाठी आणि मंडळाधिकारी यांनी सहकार्य केल्याचे निदर्शनास आल्यावर त्यांच्यावर गंभीर कारवाई केली जाणार असल्याचे या आदेशात म्हटले आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.