लोकप्रश्नच्या वृत्ताची दखल; मृत्यूचे कारण तपासणार
आ.सुरेश धस यांच्याकडून जिल्हा प्रशासनाला माहिती
आष्टी । शरद रेडेकर
तालुक्यातील तवलवाडी येथे गत 5 दिवसात तब्बल 60 संकरित गाई व 80 वासरे घटसर्प या आजाराने मृत्यूमुखी पडल्याचे वृत्त लोकप्रश्नने शुक्रवारच्या अंकात प्रकाशित केले. त्यानंतर पशुसंवर्धन विभागाने या वृत्ताची गांभीर्याने दखल घेतली. या गायींच्या मृत्यूमागचे नेमके कारण आहे हे पडताळण्यासाठी औरंगाबाद येथील पशुसंवर्धन विभागाचे प्रयोगशाळेची टीम तवलवाडीत दाखल झाली आहे.औरंगाबाद येथील विभागीय पशूरोग अन्वेषण प्रयोगशाळेच्या या पथकात डॉ.प्रशांत चौधरी,डॉ.रोहित धुमाळ, डॉ.वानखेडे यांचा समावेश आहे. मृत गायींची उत्तरीय तपासणी करून शरीरातील काही अवयवांचे नमुने त्यांनी तपासण्यासाठी घेतले आहेत. दरम्यान गुरुवारी आ.सुरेश धस यांनी हा प्रकार जिल्हाधिकारी व सीईओंच्या कानावर घातला. तसेच शेतकर्यांची भेट घेत त्यांना आधार दिला.
दरम्यान एकीकडे दुधाच्या घसरलेल्या दराने शेतकरी आर्थिक अडचणीत असताना लॉकडाऊनच्या परिस्थितीत चिंताग्रस्त असलेल्या शेतकर्यांवर पुन्हा एकदा निसर्गच कोपला की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. तवलवाडीत जवळपास दीडशे गाय-वासरांचा घटसर्पासारख्या आजाराने मृत्यू झाल्याचा अंदाज आहे.आ.सुरेश धस यांनी गुरुवारी या पशुसंवर्धन विगाच्या जिल्हा पशुसंवर्धन प्रभारी टीएचओ विनायक देशमुख, डॉ. संतोष शामदिरे,डॉ.मंगेश डेरे, डॉ. भुजबळ या सर्वाची बैठक घेऊन तातडीने उपाययोजना करा अशी सूचना केली.तसेच या घटनेची माहिती जिल्हाधिकारी व जि.प.सीईओ अजित कुंभार यांना आ.धस यांनी दिली.
त्यानंतर शुक्रवारी सकाळी आ.धस यांनी संबंधित शेतकर्यांची भेट घेत सांत्वन केले.घाबरू नका, आपले जनावरे विकू नका. ज्यांच्या ज्यांची गायी-वासरे मृत्युमुखी पडली आहेत. त्यांना शासनाच्या वतीने काही का होईना मदत देण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न आम्ही करु असा विश्वास देखील आ.धस यांनी शेतकर्यांना दिला.दरम्यान तवलवाडी गावामध्ये गेल्या पंधरा दिवसापूर्वी दोन गायी मृत्युमुखी पडल्या होत्या. त्या गाई त्या ठिकाणच्या भटक्या कुत्र्याने खाल्ल्याने जवळपास 15भटक्या कुत्र्यांचाही मृत्यू झाला होता. या घटनेची बातमी देखील लोकप्रश्नने प्रसिद्ध केली होती.मात्र या घटनेचे आष्टी येथील पशुवैद्यकीय प्रशासनाने जास्तीचे गांभीर्याने न घेतल्याने ही वेळ दुर्देवी वेळ आली आहे. तवलवाडी गावातील मृत्यूमुखी पडलेल्या जनावरांची अंदाजे किमत जवळपास 1 कोटी रुपयांच्या आसपास आहे. जनावरे आज मृत्युमुखी पडले आहेत याला कोण जबाबदार शासन जबाबदार दुग्ध व्यवसाय करणारे शेतकरी? जबाबदार हेदेखील पाहणे गरजेचे आहे. व जनतेला मोठा धीर देण्याचे काम आ. सुरेश धस नेहमीच करत असतात हे आपण यामागेही पाहिले आहे.आज पुन्हा एकदा तवलवाडी येथील मासेदेखील मृत्युमुखी पडल्याचे आढळून आले .या सर्व घटनेवर आ. सुरेश धस यांची करडी नजर असून लवकरच ते केंद्राची टीम देखील येथे पाचारण करणार असल्याचे त्यांनी सांगीतले. आष्टी तालुक्यातील शहराच्या अवघ्या 2 किलोमीटर अंतरावर असलेले ते तवलवाडी गाव दुग्ध व्यवसायामध्ये तालुक्यामध्ये अग्रगण्य असलेले हे गाव शेतकरी वर्ग फार मोठ्या प्रमाणावर दूध व्यवसाय करत असलेले गावहे गाव या गावांमध्ये अशा प्रकारची ही मोठी घटना गाई मृत्युमुखी पडण्याची घटना घडत असल्याने शेतकरी वर्ग पुरता हतबल हतबल झालेला आहे त्यांना आता सरकार दरबारी मदतीची गरज आहे.
जिल्हा पशुसंवर्धन विभागाने काल आरोग्यविषयक सर्वेक्षण केले,बी.डी.ओ. सुधाकर मुंडे साहेब, डॉ. शामधीरे, डॉ. चाटले यांच्या उपस्थित आमदार सुरेश आण्णा धस यांनी शेतकरी व पशुपालक यांच्याशी चर्चा करून धीर धरा, घाबरुन जाऊ नका,मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहुन पशुसंवर्धन विभागाच्या वतीने योग्य तो विमा मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहील असा शब्द आण्णांनी पशुपालक व शेतकरी यांना दिला....!
Leave a comment