आष्टी । वार्ताहर

मुंबई येथील चिल्ड्रन फाउंडेशन ट्रस्टच्या वतीने ओमप्रकाश शेटे यांनी आष्टी मतदार संघातील कोविंड सेंटर साठी ऑक्सिजन कॉन्सेस्ट्रेटशन या मशीन भेट दिल्या. ते म्हणाले की महाराष्ट्राच्या 288 आमदारांची पैकी  महाराष्ट्रात हा कोरोना महामारीच्या   काळात आपला जीव धोक्यात घालून जनतेचे जीव वाचवण्यासाठी सदैव जनतेत राहून सत्ताधारी पक्षात नसतानादेखील आमदार सुरेश धस यांनी या कोरोना  महामारीच्या काळामध्ये आष्टी मतदार संघामध्ये कोविंड सेंटर उभा करून फार मोठे व पुण्याचे महान कार्य केले आहे.असल्याचा गौरव उदगार   शेटे यांनी मच्छिंद्रनाथ देवस्थान येथे आयोजित छोट्याशा कार्यक्रमात बोलताना केले .

आमदार सुरेश धस हे नेहमीच संकट च्या काळी जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात हा यांचा  इतिहास आहे. त्यांनी केलेल्या. या कार्यामुळे आज भारतीय जनता पार्टीची देखील महाराष्ट्र मध्ये  देखील उंची वाढली आहे. विरोधी पक्ष नेते माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी देखील आमदार सुरेश धस यांच्या कार्याची दखल घेऊन यापुढील काळामध्ये त्यांना जी काही अडचणी जी काय गोष्ट लागेल ते त्यानां  तत्परतेने देण्याचे कबूल केले आहे. व स्वतः देवेंद्रजी फडणवीस साहेब हे आष्टी मतदारसंघांमध्ये लवकरच या कोविंड सेंटरला मच्छिंद्रनाथ सावरगाव येथे भेट देणारा आहेत असे शेटे म्हणाले.यावेळी आमदार सुरेश धस म्हणाले की बीड जिल्ह्यामध्ये सर्व आमदारांनी कोविंड सेंटर आपआपल्या मतदार संघामध्ये उभारावे .आपल्या  मतदारसंघातील जनतेची काळजी घ्यावी .कारण ते आपल्याला मत देतात ते आपल्याला मन देतात. आपण त्यांचा जीव वाचवला पाहिजे,हे आपले आदय कर्तव्य आहे. हि भावना प्रत्येकाने अंगीकारावी .असे  धस म्हणाले. की सध्याच्या महामारीच्या   काळात राजकारण बाजूला ठेवून प्रत्येक आमदाराने या कोरोनाच्या काळात काम करावे. जिथे कुठे तुम्हाला अडचण भासेल मै हू ना असा पाठीराख्यांचा आधार देखील आमदार सुरेश धस यांनी ईतर आमदारांना  दिला आहे .यावेळी  मच्छिंद्रनाथ देवस्थान येथील कोविंड  सेंटरला मदत मदतीचा ओघ सुरू आहे. आज देखिल नाथ   भक्ताने 50 थर्मामीटरचा मशीन व 11हजार   रुपयाचा धनादेश अध्यक्ष दादासाहेब चितळे यांच्या स्वाधीन केला.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.