सध्या कोरोनाची दुसरी लाट पहिल्या लाटेच्या तुलनेत अधिक धोकादायक असल्याची दिसत आहे. कोरोनाचा संसर्ग वेगानं होत आहे. मोठ्या माणसांसोबतच लहान मुलांना कोरोना संसर्ग होत आहे. मोठ्या व्यक्तींच्या तुलनेत गुंतागुंतीच्या केसेस कमी आहेत. तिसर्‍या लाटेबाबत केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने लहान मुलांना अधिक धोका असल्याची भीती व्यक्त केली आहे, यामुळे पालकांनी माझी मुले..माझी जबाबदारी ’ ओळखून अधिक सजग राहून लसीकरण करून घेणे हितावह आहे..
कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात केवळ एक टक्का तर दुसर्‍या टप्प्यात 10 टक्के मुलांना बाधा झाल्याचे दिसून येत आहे. वयस्करांमध्ये कोरोनामुळे आजार बळावत असून काही लहान मुलांना कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर त्यांच्यात कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. वयस्क आणि लहान मुलांना कोरोनाची लक्षणे सारखीच असतात.  मुलांना धोका आपल्या पालकांपासून जास्त असतो, तेच मुलांच्या संपर्कात जास्त असतात. यामुळे पालकांनी घरी गेल्यावर हात-पाय साबणाने स्वच्छ धुवावेत, कपडे बदलून लहान मुलांना घ्यावे..

लक्षणे

ताप येणे, सर्दी, खोकला

चव जाणे, वास न येणे

धाप लागणे

पोटात दुखणे

उलट्या/जुलाब होणे

डोळे लाल होणे

अंगावर पुरळ उठणे

भूक न लागणे किंवा कमी होणे

 

प्रतिबंधात्मक उपाय

मास्कचा वापर करावा. मात्र दोन वर्षांच्या खालील बालकांना श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो, यामुळे त्यांना मास्क वापरण्यास देऊ नये.
सुरक्षित अंतर ठेवून खेळणे.
घरातील मोठे कार्यक्रम टाळावेत.
गर्दीच्या ठिकाणी, कार्यक्रमात लहानांना घेऊन जावू नये.
बालकांमध्ये सॅनिटायझरच्या वापराऐवजी हात साबणाने स्वच्छ धुणे.

पालकांनी काय काळजी घ्यावी

पालक बाहेरून आल्याने मुलांना संसर्ग करू शकतात.बाहेरून आल्यानंतर कपडे बदलून, हात-पाय साबणाने धुतल्यानंतर मुलांना जवळ घ्यावे.
18 वर्षांवरील घरातील सर्व व्यक्तींनी लसीकरण करून घ्यावे
स्तनदा माता लस घेऊन बाळाला स्तनपान करु शकतात*.लहान मुलांच्या स्वच्छतेवर अधिक भर द्यावा.मुलांना सतत घराबाहेर घेऊन जाऊ नये.
हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची गरज कधी भासते?
मुलांना कोरोनाचा संसर्ग झाला तरी त्यांच्यामध्ये लक्षण दिसून येत नाहीत. मात्र इतरांना बाधा होऊ नये, यासाठी घरी आराम करावा. श्वास घ्यायला त्रास होत असेल तेव्हाच हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याची गरज असते. मुलांच्या फुफ्फुसांची तपासणी करून संसर्ग वाढला आहे का, रुग्णाला ऑक्सिजन किंवा औषधांची गरज आहे का, हे डॉक्टर ठरवतात. 

लक्षणाप्रमाणे उपचार

लहान मुलांना कोरोनाच्या लक्षणानुसार उपचार दिले जातात. *सौम्य लक्षण असली तर केवळ विलगीकरण करणे, ताप असेल तर पॅरासिटीमॉल गोळ्या दिल्या जातात. या काळात आराम, भरपूर पाणी आणि सकस आहाराची गरज आहे.
मध्यम  स्वरूपाची धाप, ताप आणि खोकला ही लक्षणे असल्यास मुलांना दवाखान्यात डमिट करावे लागते. यावेळी सलाईन, न्टीबायोटिक दिली जातात.
तीव्र प्रकारात खूप धाप असेल, धुंदी, झटका, रक्तदाब कमी होणे, संडास आणि ऑक्सिजनची पातळी 90 टक्केच्या खाली गेली असेल तर मुलांना अतिदक्षता विभागात (आयसीयू) दाखल करावे लागते. सलाईन, न्टीबायोटिक, ऑक्सिजन, स्टेरॉईड आणि रेमडेसिवीर इंजेक्शनची गरज मुलांना भासते. शिवाय एनआयव्ही, बायपॅप,सीप्याप आणि व्हेन्टिलेटरचाही वापर केला जातो. मात्र पालकांनी घाबरून न जाता, लक्षणे दिसल्यास त्वरित उपचार करून घ्यावेत, मात्र अशा सिरीयस केसेस खूपच कमी आहेत..

कोरोना होऊन गेल्यानंतर पण मुलांची काळजी घ्या

मुलांना कोरोना होऊन गेल्यानंतर तीन ते सहा आठवड्यात मल्टिसिस्टीम इफ्लेमेटरी सिड्रोम इन चिल्ड्रनचा (एमआयएससी) त्रास होतो. यामध्ये अंग, डोळे लाल होतात. रक्तदाब कमी होतो आणि हृदयाला सूज येते. या काळात मुलांना डमिट करून त्वरित उपचाराची गरज असते. स्टेरॉईड, स्पिरीन आणि इमिनोग्लोब्यूलिन या औषधांचा वापर करून रूग्णांवर उपचार केले जातात..

काय काळजी घ्याल

तिसर्‍या लाटेमध्ये मुलांना जास्त धोका असल्याने पालकांनी आतापासूनच काळजी घ्यायला हवी. कार्यक्रम, गर्दीच्या ठिकाणी मुलांना घेऊन जावू नये. लसीकरण करून घ्यावे.बाहेरून आल्यानंतर हात-पाय साबणाने स्वच्छ धुवा.मुले जास्त बाहेर जाणार नाहीत, याची खबरदारी घ्या.


  

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.